file photo 
मराठवाडा

अंतर राखण्यासाठी दुकानासमोर मार्कींग

कैलास चव्हाण

परभणी : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.या वस्तु खरेदी करताना विशेष अंतर राखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात किराना दुकाने, दुध विक्री केंद्र, आणि भाजीपाला विक्री केंद्रे यांच्यासमोर मार्कींग करण्यात येत आहे.

हेही वाचा -... तर परभणी शहराला मिळेल आठ दिवसाआड पाणी
लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असून किराणा दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी होवू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. जनतेला सोशल डिस्टन्सींगचे महत्व पटवून दिले जात असून ठराविक अंतरावर ग्राहकांनी शिस्तीत थांबून आपल्या सामानाची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी किराणा दुकानासमोर ठराविक अंतरावर मार्कींग करून सामानाची खरेदी केली जात आहे.
 
दुकानांवर गर्दी करू नये
यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका अधिकारी-कर्मचारी व आरोग्य विभागामार्फत दुकानदार व ग्राहकांना सुचना देण्यात येत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असून नागरिकांनी खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. परभणी शहरातील काळी कमान, देशमुख हॉटेल, क्रांती चौक येथील भाजी मंडई, दुध विक्री केंद्रासमोर गुरुवारी मार्कींग करण्यात आले. तसेच शहरातील बहुतांष मेडीकल, किराणा दुकानासमोर देखील मार्कींग करण्यात आले आहे.


 तंबाखुजन्य पदार्थांची चोरी-छुपे विक्री
परभणी : जिल्हा प्रशासनाने ‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना काही व्यावसायिक मात्र चोरी-छुपे बंदी घातलेल्या साहित्याची विक्री करीत असून त्यामध्ये पानमसाला, गुटख्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे चित्र आहे. शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, कडबी मंडी, कालाबावर, सरकारी दवाखाना आदी परिसरांसह हे छोटे-मोठे व्यावसायिक स्वतःचा तर जीव धोक्यात घालीतच आहेत, त्याच बरोबर अन्य खरेदी करणारे नागरिकदेखील त्याची री ओढत असल्याचे चित्र दिसून येते. जिल्हा प्रशासनाने ता. १९ मार्च रोजी एक आदेश काढून पानपट्टीधारक, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थी विक्री केंद्रे बंद करण्याचे आदेश दिले होते. विक्री झालेल्या तंबाखुजन्य पदार्थाच्या थुंकीमधून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT