marriage beuro
marriage beuro 
मराठवाडा

चांगली स्थळे सुचवतो, आधी खात्यात पैसे टाका!

संकेत कुलकर्णी

औरंगाबाद - मुलामुलींच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या पालकांना फोन करून चांगली स्थळे सुचविण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत. वेगवेगळ्या क्रमांकांवरून कॉल करून वधू-वर सूचक केंद्राचा बनाव केला जातो आणि तीन ते पाच हजार हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळली जात आहे. कुठलेही संकेतस्थळ, पत्ताही न देणाऱ्या या फसव्या वधू-वर सूचकांपासूनच ‘साऽऽवऽधाऽन’ म्हणण्याची वेळ आली आहे.

पूर्वी लग्न जुळत नसले, की वधू-वर सूचक केंद्रात नावे नोंदवतात, असा गैरसमज होता. पण, आता अनुरूप जोडीदार मिळवण्यासाठी ऑनलाइन पर्याय म्हणून अनेक संकेतस्थळांचा बाजार झाला आहे. हजारोंनी स्थळांची नोंद असलेल्या या संकेतस्थळांवर नोंदणीसाठी तीन ते पाच हजार रुपये शुल्कही आकारले जाते. प्रत्येक समाजाच्या वधू-वर सूचक केंद्राची परिचय पुस्तिकाही प्रकाशित होते. पण, याच डेटाच्या बळावर विवाहेच्छुकांना गंडा घालणाऱ्यांचे मोठे पीक आले आहे. अशा पुस्तिकांमधून संपर्क क्रमांक मिळवून वधू-वरांच्या पालकांना फोन केले जातात. काही मोजकी चांगली स्थळे सुचवून अधिक माहिती हवी असल्यास अगोदर बॅंक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले जाते. मात्र, संकेतस्थळ किंवा पत्ता सांगण्यास टाळाटाळ केली जाते. काही पालकांनी हा प्रकार ‘सकाळ’च्या निदर्शनास आणून दिला. नाव न छापण्याच्या अटीवर एक-दोघांनी आपली अशी फसवणूक झाल्याचेही कबूल केले.

पूर्ण खात्री करून घ्या
संबंधित वधू-वर सूचकाची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय आपल्या मुला-मुलींची माहिती, छायाचित्रे कुणालाही पाठवू नका. अधिकृत संकेतस्थळ किंवा नोंदणीकृत वधू-वर सूचक केंद्राशिवाय इतर कुठेही नोंदणी करू नका. कुणाच्याही सांगण्यावरून, केवळ मोबाईल संभाषणावरून खात्यात पैसे जमा करू नका.

हे आहेत धोके
विवाहेच्छुकांना फसवे कॉल्स
सुयोग्य स्थळे सुचविण्याचे आमिष
पाच हजारांपर्यंत रकमेची मागणी
विविध क्रमांकांवरून येतात फोन
संकेतस्थळ नाही, पत्ताही देत नाहीत

आम्ही वधू-वर परिचय मेळावे घेतो. त्यात नोंदणी करणाऱ्या स्थळांची माहितीपुस्तिकाही प्रकाशित करतो. पण, काही खासगी व्यक्ती ती माहिती चोरून फसवेगिरी करत असल्याच्या तक्रारी आमच्या कानावर आल्या होत्या. पालकांनीही असे प्रकार घडत असल्याचे सांगितले. आजकाल विवाह जुळणे अवघड झाले असले, तरी कुणावरही आंधळा विश्‍वास ठेवून फसू नका. अधिकृत नोंदणी केंद्र किंवा संकेतस्थळांचाच वापर करा.
- मनोज पाडळकर, सचिव, वरद गणेश मंदिर.

काही पालक अशा प्रकाराला बळी पडल्याच्या एक-दोन घटना आमच्याही कानावर आल्या होत्या. नोकरी देणाऱ्या कन्सल्टन्सीसारख्या काही फसव्या टोळ्या असे रॅकेट चालवत असतात. मुला-मुलींचे विवाह जुळत नसल्याने कंटाळलेले लोक शक्‍यतो अशा आमिषाला बळी पडतात; परंतु अधिकृत केंद्रांवरच नोंदणी करा. फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.
- पवन जानोरकर, मराठा वधू-वर सूचक केंद्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT