Latur Municipal Corporation 
मराठवाडा

लातुरातील महिलांसाठी `मी सौभाग्यवती` स्पर्धा, खतनिर्मितीसाठी महापालिकेचा पुढाकार

हरी तुगावकर

लातूर : घरात निर्माण होणारा ओला कचरा घराच्या परिसरातच कुजवून त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करावे, या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने 'मी सौभाग्यवती' ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक घरात ओला व सुका कचरा निर्माण होतो. यातील ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करावी आणि शहर स्वच्छतेच्या उपक्रमात हातभार लावता यावा यासाठी चारही झोनमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

ता.१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीसाठी ही स्पर्धा असणार आहे. ता. १५ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत महापालिकेच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी कशा पद्धतीने कंपोस्टिंगची प्रक्रिया राबवली आहे याची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक झोनमधून तीन महिलांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिलेला मायक्रोवेव्ह ओव्हन, द्वितीय क्रमांकासाठी ज्युसर, मिक्सर ग्राईंडर आणि तृतीय पारितोषिक म्हणून प्रेशर कुकर दिले जाणार आहे.

जे बचत गट होम कंपोस्टिंगला प्रोत्साहन देतील अशा दोन गटांनाही विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत शहरातील अधिकाधिक महिलांचा सहभाग कसा नोंदवता येईल यासाठी स्वच्छताताईंच्या वतीने मार्गदर्शन व माहिती पत्रकांचे वाटप केले जाणार आहे.ज्या स्वच्छताताई अधिक महिलांचा सहभाग करून घेतील त्यांना देखील विशेष पारितोषिके देऊन सन्मानित केले जाणार आहे. शहरातील अधिकाधिक महिलांनी यात सहभाग नोंदवून 'मी सौभाग्यवती' हा सन्मान प्राप्त करावा. शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या कामी हातभार लावावा, असे आवाहन उपायुक्त मंजुषा गुरमे यांनी केले आहे.
 

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuzvendra Chahal: क्रिकेटर युझवेंद्र चहलची भाजपमध्ये एन्ट्री; ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय टीममध्ये मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : बिल्डरांसाठी शहरातील ४७ नाले वळविले; महापालिका सभागृहात प्रशासनाची माहिती

Ambad Accident : दुचाकी चालक युवक विजेच्या पोलला धडकल्याने अपघातात जागीच ठार: परीक्षेचा पेपर देऊन तीर्थपुरीला जाताना घडली घटना

Beed Crime : ५१.९० लाखांचे तेल परस्पर विकून रचला अपघाताचा बनाव; टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai News : १५० रेल्वे स्थानकांवर लवकरच ड्रोनची गस्त! लोकलच्या सुरक्षेला १४ हायटेक उपकरनाचे कवच

SCROLL FOR NEXT