परभणीतील शाळेमध्ये मिकीमाऊस, छोटा भीम, पोकी मॅन स्वच्छतेचा जागर करताना. 
मराठवाडा

मिकीमाऊस, छोटा भीम, पोकी मॅन करतात स्वच्छतेचा जागर !

सकाळ वृत्तसेवा

परभणी : शहराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महापालिका विविध माध्यमांतून कसोसीने प्रयत्न करीत आहे. ‘चालता बोलता’ या निखळ मनोरंजनाच्या कार्यक्रमातून स्वच्छतेचे महत्त्व बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा उपक्रम व त्यामध्ये मिकीमाऊस, छोटा भीम, पोकी मॅन अशा विविख कॅरेक्टर्सच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृतीस मोठा प्रतिसाद मिळत आहे.


महापालिका स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरात विविध उपक्रम राबवित आहे. नालेसफाई, सार्वजनिक स्वच्छता, कंपोस्ट खत निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, चौकांचे सुभोभीकरण आदी उपक्रम राबविले जात आहेत. शहराला ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा मिळाला आहे. आता पालिका ‘ओडीएस प्लस प्लस’ दर्जा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. हे सर्व उपक्रम पालिकेंतर्गत आहे. विविध फलकांच्या माध्यमातूनदेखील जागृती करण्याचा प्रयत्न पालिका करीत आहे. परंतु, थेट नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी जोडणारा उपक्रम म्हणजे ‘चालता बोलता’. याला मात्र, बाल चिमुकल्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.


प्लॅस्टिक बंदी विषयी मार्गदर्शन
महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुऱ्हा, शेख शादाब, मेहराज अहेमद, विकास रत्नपारखे, श्री. घुगे यांच्यासह चालता बोलताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेणारे प्रकल्प अधिकारी इख्तियार पठाण यांच्या पुढाकाराने शहरातील विविध शाळांमध्ये हा कार्यक्रम पोचत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे. या उपक्रमात प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांना हसवत, खेळवत स्वच्छता, कचऱ्याचे प्रकार, कंपोस्ट खत निर्मिती, परिसर स्वच्छता, वर्गिकृत कचऱ्याची विल्हेवाट, प्लॅस्टिक बंदी आदींविषयी मार्गदर्शन केल्या जात आहे.

शाळांमध्ये महापालिकेचे पथक
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे विविध कॅरेक्टर्स. हे बाल चिमुकल्यांना खिळवून ठेवत असून त्यांच्या हालचाली विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रीत करतात. त्यांनी लावलेले स्वच्छताविषयक फलकाकडे त्यामुळे विद्यार्थी आकर्षिक होत आहेत.
दररोज एक ते दोन शाळांमध्ये महापालिकेचे हे पथक पोचत असून स्वच्छतेविषयी जनजागृती करीत आहेत. सोमवारी (ता. १३) भारतीय बाल विद्यामंदिरात हा उपक्रम राबविण्यात आला.


विद्यार्थ्यांची भरभरून दाद


महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थी हे दूताचे काम करतात तसेच त्यांच्या मनावर आताच स्वच्छतेचे महत्त्व बिंबवले, तर भविष्यात ते एक आदर्श नागरिक होऊ शकतात. म्हणून हा मनोरंजनात्मक उपक्रम हाती घेतला असून त्यास विद्यार्थी भरभरून दाद देत आहेत.


- करण गायकवाड
मुख्य स्वच्छता निरीक्षक, महापालिका, परभणी.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT