Crime News Esakal
मराठवाडा

Selu Crime : लाॅजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलिसांनी मुलीसह तरूणाला घेतलं ताब्यात

अल्पवयीन मुलीस लाॅजमधील खोलीमध्ये नेवून तिच्या मनाविरूद्ध अत्याचार केल्याची घटना घडली.

विलास शिंदे

सेलू : शहरातील रेल्वेस्थानकाजवळील गोविंदा लाॅज इथं एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना गुरूवारी (ता. २२) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

शहरातील रहदारीच्या रेल्वेस्थानक रस्त्यावरील दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीस लाॅजमधील खोलीमध्ये नेवून तिच्या मनाविरूद्ध अत्याचार केल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी लाॅजकडं धाव घेतली.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी येवून मुलीस व तरूणाला ताब्यात घेत ठाण्यात नेलं.

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी जमीर दादामिया कुरेशी व मोबिन अन्सारी विरोधात बाल लैंगिक अत्याचारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल ओहोळ, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनात सपोनि अंधारे हे करत आहेत.

लाॅज चालकाचा गोरखधंदा

शहरात सात ते आठ लाॅज आहेत. लाॅज ज्यावेळेस बुक करायचे आहे. त्यावेळी आधार कार्ड किंवा इतर एखादा रहिवाशी पुरावा बंधकारक आहे. मात्र, लाॅज चालक पैशाच्या लोभापायी अल्पवयीन मुला-मुलींना, महाविद्यालयीन तरूण -तरूणींना राहण्यासाठी खोली उपलब्ध करून देत आहेत.

दोन तासाचे दीड ते दोन हजार भाडे आकारणी केली जाते. दिवसभरात तीन चार ग्राहक आले तर आठ हजाराच्याजवळ भाडे लाॅज मालकाला येते. त्यामुळं अशा प्रकारच्या घटना घडत असून या सर्व लाॅजची दिवसा व रात्री तपासणी करावी, अशी नागरिकांत चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT