राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्य़क्ष अॅड. मोहमदखान पठाण
राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्य़क्ष अॅड. मोहमदखान पठाण 
मराठवाडा

'मोदी सरकारने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण करुन टाकले'

जलील पठाण.

गेल्या सात वर्षात मोदी सरकारने महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमती गगनाला भिडवत सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण करुन टाकले आहे.

औसा (जि.लातूर) : लोकांना खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभुल करुन सत्तेत आलेले मोदी सरकार हे निव्वळ बोलबपच्चन सरकार असुन त्यांनी लोकांचा सर्वच पातळीवर भ्रमनिरस केला आहे. गेल्या सात वर्षात मोदी सरकारने Modi Government महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमती गगनाला भिडवत सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण करुन टाकले आहे. जातीय आणि फोडाफोडीचे राजकारण करीत सत्ता उपभोगत असलेल्या या केंद्र सरकारला लोकांच्या हिताचे निर्णय घेता आले नाहीत. या सरकारच्या हटवादी आणि मनमानीपणामुळे अनेक लोक उद्धवस्त झाले आहेत. मुस्लिम धर्माचा बुरखा पांघरुण मुस्लिमांबद्दल कळवळा दाखविणारा एमआयएम पक्ष AIMIM हा मुस्लिम धर्मातील आरएसएस RSS असून मोदींना फायदा कसा होईल. यासाठीच तो प्रयत्नशील असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे Nationalist Minority Cell प्रदेशाध्य़क्ष अॅड. मोहमदखान पठाण यांनी केली. रविवारी (ता.१३) ते औसा Ausa येथे पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर बोलत होते. यावेळी लातुर Latur जिल्ह्याचे अध्यक्ष रशिद शेख, नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष मुसुद शेख, प्रदेश उपाध्यक्ष हुजुर ईनामदार, फारुख मटके, प्रदेश सरचिटणीस संजय शेटे, माजी महापौर अख्तर मिस्री, माजी नगराध्यक्ष जावेद शेख, भरत सुर्यवंशी, दत्तात्रय कोळपे, गोविंद जाधव, प्रदीप मोरे, मुजाहेद शेख, अविनाश टिके आदी उपस्थित होते. श्री.पठाण म्हणाले की, औसा तालुक्यातच नव्हे तर लातुर जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्यात औशाच्या शेख कुटुंबाचे मोठे योगदान आहे. कै. एन.बी. शेख आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे अतिशय घनिष्ठ संबंध असल्याने औशाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन आपलेपणाचा आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे. अल्पसंख्यांक समाजाला आरक्षण आणि बेरोजगार युवकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक महामंडळाकडून करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. Modi Government Harder Common Man's Life

पद शोभेसाठी नाही तर प्रश्न सोडविण्यासाठी

माझ्या प्रदेशाध्यक्षपदामुळे अल्पसंख्यांकाना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी मी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत असुन लवकरच अल्पसंख्यांकाच्या समस्या सुटतील. त्यासाठी नुसते प्रय़त्न गरजेचे नसुन तर त्याचे रिझल्टवर माझा विश्वास आहे. असेही ते म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT