file photo 
मराठवाडा

मातेने आवळला चिमुकल्याचा गळा, अन्...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मनोविकृत असलेल्या मातेने पोटच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याचा गळा आवळून निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह नालीत फेकला. ही घटना मालटेकडी रेल्वेपुलाखाली ता. पाच मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठण्यात मातेविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल रविवारी (ता. आठ) मार्च रोजी रात्री दाखल करण्यात आला आहे. 

शहराच्या सांगवी परिसरातील बाबानगर येथे राहणारा राहूल कोंडिबा गहूबळे हे आपल्या पत्नीसह राहतात. यांना दीवेश नावाचा तीन वर्षाचा मुलगा होता. नेहमीप्रमाणे राहूल गहूबळे हा आपल्या गॅरेजवर काम करण्यासाठी गेला होता. घरी त्याची पत्नी होती. मनोविकृत असलेल्या पत्नीने वेडाच्या भरात स्वतः च्या दीवेश नावाच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून केला. हे कृत्य करत असतांना तीला काहीच वाटले नाही. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी तीन आपल्या मुलाचा मृतदेह मालटेकडी रेल्वेस्थानाच्या पुलाखाली वाहणाऱ्या एका नालीत फेकला. 

मालटेकडी रेल्वेस्थानकाच्या पुलाखाली नालीत मृतदेह

नालीत टाकलेले बाळ तेथील काही नागरिकांनी पाहिले. यानंतर त्यांनी विमानतळ पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक संजय ननवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जाधव, श्री. शिनगारे, फौजदार नजीर शेख, हवालदार बाबूराव वाघमारे, श्री. कुरुळेकर, शेख काझी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. तीन वर्षाच्या दिवेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या लक्षात आले. 

विमानतळ पोलिसांनी केला खूनाचा उलगडा

मृतदेह सडला होता व ओळख पटविणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी त्या मुलाचा फोटो काढून त्या परिसरात काही नागरिकांना व महिलांना दाखविला. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी त्याच्या पालकाला बोलावून घेतले. आपलाच मुलगा असल्याची कबूली देत वेडसर पत्नीने त्याचा पांढऱ्या रंगाच्या कापडाने खून करून नालीत फेकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा

राहूल गहूबळे याच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिसांनी कांचन गहूबळे या निर्दयी मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कांचन गहूबळे हिला अटक केली. तपास पोलिस निरीक्षक संजय ननवरे करत आहेत. सोमवारी (ता. नऊ) आरोपी कांचन गहूबळे हिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवस पोलिस कोठडीत पाठविल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. ननवरे यांनी सांगितली.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT