crime against woman 
मराठवाडा

सासूचे अघोरी कृत्य,सुनेला भाच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले

सकाळ डिजिटल टीम

आष्टी (जि.बीड) : बीड (Crime In Beed) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वंशाच्या दिव्यासाठी चक्क आईने तीन मुलांसाठी सहा सुना करुन आणल्याचा प्रकार घडला आहे. एका गरोदर सुनेच्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले आहे. तालुक्यातील (Ashti) जळगाव येथील ही घटना. येथील एका कुटुंबात आई, वडील आणि तीन मुले. हे तिन्ही मुले विवाहित आहेत. मात्र कोणालाच मुलबाळ नाही. त्यामुळे आईनेच तिघांसाठी सहा सुना आणल्या होत्या. एका मुलाच्या अगोदरच्या पत्नीला मुलगा न झाल्याने तिच्यासोबत फारकत घेतली. त्या मुलाचा दुसरा विवाह (Crime Against Woman) लावून दिला. दुसऱ्याही पत्नीला मुलगीच झाली. त्यामुळे वंशाचा दिव्यासाठी सासूने आपल्या २९ वर्षीय सुनेला स्वतःच्या अविवाहित भाच्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. सुनेने विरोध केल्यावरही तिला धाक दाखवून अत्याचार करण्यात आला.

पीडिताने थेट आष्टी पोलिस ठाणे गाठून सासरची मंडळी, पती आणि अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपींना अटक केली होती. मात्र त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. अत्याचार करणारा तरुण व पीडितेची सासू फरार आहेत. आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडितेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

Pune News : बेपत्ता दोन मुली सुखरूप सापडल्या; पाचशे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले

ST Workers Diwali: एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट; अग्रीम म्हणून 'इतकी' रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT