नांदेड ः स्थायी समिती सभापतिपदाची सुत्रे सभापती अमितसिंह तेहरा यांनी स्वीकारली. 
मराठवाडा

‘या’ महापालिकेने केली ३३ कोटींची करवसुली

अभय कुळकजाईकर

नांदेड - महापालिकेने ता. ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराची ३२ कोटी ९५ लाख ८८ हजार रुपयांची वसुली केली आहे. शास्तीमाफीचा अनेकांनी फायदा घेतला असून डिसेंबर महिन्यात १३ कोटी १५ लाखांची वसुली झाली आहे. ता. ३१ मार्चअखेर ६० कोटी करवसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अमित तेहरा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता. सात) स्थायी समिती सभागृहात मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, क्षेत्रीय अधिकारी राजेश चव्हाण, प्रकाश गच्चे, रावण सोनसळे, डॉ. रईसोउद्दिन, संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधीक्षक दत्तात्रय पाटील यांच्यासह वसुली लिपिक, पर्यवेक्षक व सदस्य उपस्थित होते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक
या वेळी मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेऊन सभापती तेहरा व गाडीवाले यांनी सर्वात जास्त करवसुली करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयाने सर्वात जास्त पाच कोटी ६१ लाख रुपये कर वसुली केली. येत्या तीन महिन्यांत मार्चअखेरपर्यंत दिलेले करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही या वेळी सांगण्यात आले. 

मागील वर्षापेक्षा जास्त वसुली
मालमत्ता कराची एकूण १८५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात २०१९ - २० चालू वर्षाची मागणी ५८ कोटी होती. त्याचबरोबर थकबाकीची शास्ती ५६ कोटी, तर अनधिकृत बांधकामावरील शास्ती २० कोटी रुपये होती. आता ता. ३१ डिसेंबरपर्यंत ३२ कोटी ९५ लाख ८८ हजार ४६४ रुपयांची वसुली झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा डिसेंबरपर्यंतच जास्त कर वसुली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी २०१८-१९ मध्ये ४८ कोटी रुपयांची, तर २०१७-१८ या वर्षामध्ये ४२ कोटी रुपयांची करवसुली झाली होती. 

करवसुलीसाठी पथकांची स्थापना 
महापालिका हद्दीत एकूण एक लाख १६ हजार मालमत्ता असून आतापर्यंत जवळपास ३३ कोटींची करवसुली झाली आहे. आता ता. ३१ मार्चअखेर ६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या संदर्भात मालमत्ताधारकांना वसुली लिपिकांमार्फत मागणी नोटिसा देण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत सवलती देण्यात आल्या होत्या त्याचा लाभही अनेकांनी घेतला आहे. आता करवसुलीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथकांची स्थापना करण्यात आली आहे. 
- अजितपालसिंघ संधू, उपायुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: ''मी पक्ष सोडलेला नाही...'', शिवसेनेकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरल्यानंतर सचिन अहिर काय म्हणाले? शिंदेंनी सांगितली तांत्रिक बाजू

Police Officer Transfer: पोलीस खात्यात मोठी उलथापालथ! १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी नियुक्ती; तातडीने रुजू होण्याचे आदेश

Shashank Singh : आचाऱ्याला मारहाण प्रकरणाला नवं वळण! PBKS च्या फलंदाजाने मौन सोडले; म्हणाला, तो आचारी नव्हताच...

लग्नानंतर जोडीदाराने चीट केलं तरीही माफ करायचं... राम कपूरचं धक्कादायक वक्तव्य, आकांक्षा चामोला संतापली, म्हणते-

Aditya Thackeray On Sachin Ahir : सचिन अहिर शिंदे सेनेत जाताच आदित्य ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, 'काय कमी केलं'

SCROLL FOR NEXT