file photo 
मराठवाडा

भयानकच : सुनेनेच केला वयोवृद्ध सासूचा खून, काय आहे कारण? ते वाचाच

सकाळ वृत्तसेवा

उमरी (जि. नांदेड) : तालुक्यातील पळसगाव येथील एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा स्वतःच्याच सुनेने आपला प्रियकराच्या मदतीने सासुचे डोके भिंतीवर आपटून खून केल्याची घटना (ता.१८) एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली होती. तब्बल आठ दिवसानंतर या घटनेचे वास्तव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

घटना घडून तब्बल आठ दिवस  मयत महिलेच्या नऊ वर्ष वयाच्या नातीने खुनाचा उलगडा केला. तीने सांगितले, आई अनिता संभाजी वानखेडे व गावातीलच आरोपी  माधव दत्तराम पवळे यांनी त्या रात्री उशिरा आजीला कशाप्रकारे जीवे मारले ते वडिलांना सांगितले.  यावरुन मयत महिलेचा मुलगा संभाजी माधवराव वानखेडे यांनी उमरी पोलिसांत रितसर तक्रार दिली. त्यानंतर  घटनेतील आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उमरी पोलिसांनी दिली.

तब्बल आठ दिवसांपूर्वी हा खून घडलेला असल्याने सदर महिलेचा अंत्यविधी (ता.१९) करण्यात आला होता. खुनाच्या तपासासाठी उमरीचे पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी प्रेत पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी तहसीलदार उमरी यांच्या परवानगीने शिंधी येथील डॉ.कस्तुरे यांच्या मदतीने रविवारी (ता.२६ ए्प्रिल २०२०) रोजी धर्माबाद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पळसगाव येथे जाऊन शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा अत्यंविधी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उमरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी संभाजी माधवराव वानखेडे यांची आई मयत लक्ष्मीबाई माधवराव वानखेडे (ता.१८) एप्रिलला घरी हजर असताना आरोपी माधव पवळे (वय ३५) याने माझ्या घरी येऊन माझी पत्नी अनिता वानखेडे (वय ३०) हिच्यासोबत रात्री बाराच्या सुमारास अनैतिक शारिरीक संबंध करत असताना लक्ष्मीबाई यांनी बघितल्याने   त्याबाबत फिर्यादीस व गावातील इतर नातेवाईकांना सांगु नये, याकरता मयत लक्ष्मीबाई हिला जीवे मारण्याच्या उद्देशाने माधव पवळे हा व फिर्यादीची पत्नी अनिता वानखेडे यांनी कट रचून लाथा बुक्याने मारहाण करुन केस धरुन डोके भिंतीवर आपटून मारुन टाकले आहे.

सदरील घटना फिर्यादीच्या लहान मुलीने प्रत्यक्ष पाहिल्याने तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी संभाजी माधवराव वानखेडे (वय ३५) यांच्या माहितीवरुन उमरी पोलिस ठाण्यात आरोपी माधव दत्तराव पवळे (वय ३५) व अनिता संभाजी वानखेडे (वय ३०) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अंनत्रे करीत आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जमादार श्री.गेडाम यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : 'एक पेड बाप के नाम' गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा संकल्प

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT