file photo 
मराठवाडा

मराठवाड्यात नांदेडचा डंका......कशात ते वाचायला हवे

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : लातूर येथे पार पडलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत नांदेड जिल्ह्याने विजयी पंरपरा कायम राखत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. रविवारी (ता. नऊ) जिल्हा क्रीडा संकुलात राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी पारितोषिक स्वीकारले. 

नांदेडचा सर्वच गटात दबदबा
दरवर्षी महसूल विभागाच्या जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार काम करणारे २१९ अधिकारी, कर्मचारी लातूर येथे ता. सहा ते ता. आठ फेब्रुवारी दरम्यान, विभागीय स्पर्धेत सहभागी झाले होते. यात १५४ पुरुष, तर ६५ महिलांनी वैयक्तिक, सांघिक, सांस्कृतिक तसेच पथसंचलन प्रकारात भाग घेतला.

२९१ गुणांसह नांदेड अव्वल
लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल तसेच इतर ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेत नांदेडसह, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी व हिंगोली या आठ जिल्ह्यांतील स्पर्धकांनी भाग घेतला. यात नांदेड जिल्ह्याने सांघिक प्रकारात ७२, वैयक्तिक प्रकारात २१९, असे एकूण २९१ गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर १८८ गुणांसह लातूर दुसऱ्या, तर १४७ गुणांसह औरंगाबाद जिल्हा तिसऱ्या स्थानी राहिला.

निकाला जाहीर होताच जल्लोश
रविवारी (ता. नऊ) स्पर्धेचा अंतिम निकाल जिल्हा क्रीडा संकुलात जाहीर झाला. यात नांदेडला सर्वसाधारण विजेतेपद मिळताच उपस्थित जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्यासह स्पर्धकांनी जल्लोष साजरा केला. या वेळी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे उपस्थित होत्या. स्पर्धेत निवेदन तहसीलदार जीवराज डापकर, मृणाल जाधव, नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी केले.

वडदकरांच्या भारूडाने वेधले लक्ष
सांस्कृतिक स्पर्धेत उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी विजय भाकरे यांनी सादर केलेले ‘तुला बुरगुंडा होऊ दे’ हे भारूड सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी महिलेचा वेष परिधान करून हुबेहूब अभिनय सादर केला. त्यांना नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी साथ दिली. महेश वडदकर यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT