file photo 
मराठवाडा

संचारबंदीत नांदेड गोळीबाराने हादरले, एक ठार, दोन गंभीर.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : संपत्तीच्या वादातून दोन सख्या चुलतभावात झालेल्या हाणामारीत चक्क गोळीबार करण्यात आला. यात एकजण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शहराच्या खुदबेनगर, देगलूरनाका परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास घडली. शहरात संचारबंदी असल्याने जखमीवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने पोलिसांची व नातेवाईकांची चांगलीच दमछाक उडाली. 

शहरात संचारबंदी असल्याने सर्वत्र स्मशान शांतता होती. परंतु देगलूर नाका भागात खुदबेनगर परिसरात झालेल्या गोळीबाराने नांदेड शहर दणाणले. आणि एकच गोंधळ उडाला. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, खुदबेनगर भागात अली जर्दावाला व गौस इनामदार या दोन चुलतभावांमध्ये संपतीचा जूना वाद आहे. हा वाद मागील सहा ते सात वर्षापासून धुमसत होता. या भागातील गाडेगाव रस्त्यावर गौस इमानदार यांच्या नातेवाईकाची औषधी दुकान आहे. या दुकानासमोर सकाळी ११ वाजता गौस इनामदार व अली जर्देवाला यांच्यात वाद झाला. हा वाद काही वेळापूरता मिटला. 

गोळीने गोळीला उत्तर

मात्र दुपारी चारच्या सुमारास पुन्हा हे एकामेकासमोर आले. सुरवातीला हाणमारी झाली. त्यानंतर पिस्तुलद्वारे गोळीबार करण्यात आला. यावेळी अली जर्देवाला याचा भाऊ महमद जुनेद (वय ३०) हा गोळी लागल्याने जागीच ठार झाला. तर दुसरा भाऊ महमद हाजी याच्या पाठीत दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अली जर्दावाले यांनीही बचावासाठी गोळीबार केला. यात गौस इनामदार हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमींना शासकिय व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुन्हा जखमीना शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

देगलूर नाका भागात तणावाचे वातावरण

घटना घडल्यानंतर या भागात तणावाचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, इतवारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, नांदेड ग्रामिणचे पंडीत कच्छवे, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांनी भेट दिली. घटना नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.  
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात 3 लाख कुणबी नोंदी, जुन्नर- खेडमध्ये सर्वाधिक दाखले; मराठा आरक्षण जीआर आधीच आकडेवारी समोर

Asia Cup 2025 AFG vs HK : अफगाणिस्तानची विजयी सलामी, आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात हाँगकाँगचा दारुण पराभव...

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Panchang 10 September 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Education : राज्यात शिक्षणगळती चिंताजनक; इयत्ता नववी-दहावीतील ११.५ टक्के विद्यार्थी शिक्षणातून बाहेर

SCROLL FOR NEXT