नांदेड महापालिका 
मराठवाडा

नांदेडच्या महापौर, उपमहापौरांची निवडणूक लांबणीवर...

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या बाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सोमवारी (ता. २७) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची मुदत एप्रिलअखेर ता. ३० रोजी संपणार होती. कोरोनाच्या फैलावामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे आता ही निवडणुक पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या महापौर आणि उपमहापौर यांना आणखी कालावधी मिळणार आहे. 

मंत्रीमंडळाची झाली बैठक
मुंबईला सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण सहा निर्णय घेण्यात आले. त्यात नांदेड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीसंदर्भातील विषय होता. नांदेड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर यांच्या निवडणुका कोरोनाच्या संक्रमणामुळे तीन महिने किंवा राज्य शासन ठरवेल त्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

अडीच वर्षाचा होता कालावधी
या संदर्भातील अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येईल. या महापौर व उपमहापौर यांचा कालावधी तरतुदीनुसार अडीच वर्षे इतका आहे. सध्या नांदेड महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता असून महापौर म्हणून दीक्षा धबाले, तर उपमहापौर म्हणून सतीश देशमुख तरोडेकर हे कार्यरत आहेत. त्यांचा कालावधी ता. ३० एप्रिलला संपणार होता.

कॉँग्रेसचे आहे महापालिकेवर वर्चस्व
नांदेड महापालिकेची आक्टोंबर २०१७ मध्ये निवडणुक झाली होती. त्यात कॉँग्रेसला जंबो बहुमत मिळाले. ८१ पैकी ७३ जागा कॉँग्रेसला मिळाल्या होत्या तर भाजपला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले होते. एका जागेवर शिवसेना तर एका जागेवर अपक्ष निवडून आला होता. कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे आणि सध्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे वर्चस्व असल्याने महापौर, उपमहापौर तसेच इतर पदांवर कॉँग्रेसचाच नगरसेवक विराजमान होणार होता. त्यानुसार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री डी. पी. सावंत आणि आमदार अमर राजूरकर यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत सव्वा सव्वा वर्षाचे नियोजन केले होते. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षात महापौर म्हणून शीला भवरे तर उपमहापौर म्हणून विनय गिरडे पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर महापौर म्हणून दीक्षा धबाले तर उपमहापौर म्हणून सतिश देशमुख तरोडेकर यांची निवड करण्यात आली. यांची मुदत ता. ३० रिल रोजी संपणार होती. आता कोरोनामुळे मुदतवाढ मिळाली आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT