Vande Bharat Express  esakal
मराठवाडा

Vande Bharat : नांदेड-मुंबई 'वंदे भारत' रेल्वे लवकरच सुरू होणार; चिखलीकरांनी मानले मोदींचे आभार

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई - नांदेड या रेल्वे मार्गावर लवकरच ‘वंदे भारत’ ही अती जलद रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वच आघाड्यांवर विकास सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे देशभर विणले जात असताना रेल्वे मार्गही सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरातील अनेक भागात रेल्वेचे नवे जाळे विणले जात आहे.

वंदे मातरम ही अत्यंत जलद वेगवान रेल्वे गाडीही देशवासीयांना सुलभ आणि सुकर प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वंदे भारत रेल्वेचा लाभ मराठवाड्यातील आणि नांदेडच्या रेल्वे प्रवाशांना व्हावा, यासाठी खासदार चिखलीकर यांचा पाठपुरावा सुरू होता.

आता ह्या पाठपुराव्याला लवकरच यश येणार आहे. मुंबई - नांदेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच वंदे भारत ही रेल्वे मुंबई - नांदेड धावणार आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विशेष परिश्रम लाभल्याचेही खासदार चिखलीकर यांनी सांगितले. त्यामुळे मराठवाड्याचे आणि नांदेडच्या विकासाला नवी गती मिळणार असून नांदेडकरांसाठी वंदे भारत एक मैलाचा दगड ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना खडे बोल

Latest Marathi News Live Update : पुणे जैन हॉस्टेल सुनावणी प्रकरणी अपडेट

Market Today : MCX वर ट्रेडिंग ठप्प! गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

Gastroenterologist warning: रिकाम्या पोटी अजिबात आंबट पदार्थांसह 'हे' 2 पदार्थ खाऊ नका, गॅस्ट्रोलॉजिस्टने व्हिडिओ शेअर करत दिली कारणे

SCROLL FOR NEXT