फोटो 
मराठवाडा

नांदेड पोलिसांनी जप्त केलेला ८५ लाखांचा ऐवज फिर्यादीना परत

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेला ९५ गुन्ह्यातील ८५ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हा ऐवज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते फिर्यादीना परत देण्यात आला. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड आणि भोकरचे विजय पवार यांची उपस्थिती होती. चोरी गेलेला ऐवज परत मिळाल्याने पोलीसांबाबत जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावर आयोजीत केलेल्या मुद्देमाल परत कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी महापौर दिक्षा धबाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्माताई सतपलवार, उपमहापौर सतीश देशमुख, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार

पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, चोरीला गेलेला एैवज फिर्यादीस परत मिळाल्यामुळे लोकांच्या अपेक्षासोबतच आता पोलीस दलाचीही जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे पोलीस दलाला अधिकाधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पोलीस बळकटीअंतर्गत शहरात मौक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या मुद्देमालामध्ये एकूण ८५ लाख ६५ हजार ६९९ रुपयांचा ऐवज ज्यात वाहने, दागिने व इतर साहित्य पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या मुळ मालकास सन्मानपूर्वक देण्यात आले.

अनेकांनी पोलिसांचे मानले आभार 
 
यावेळी उत्तम नरवाडे, वामननगर, सुंदरलाल किशनलाल गुरुखुदे रा. गवळीपुरा ईतवारा, किशन माधवराव वाघमारे, शेख इसुफ शेख मैनोद्दीन रा. भोकर चिखलवाडी, संगमेश्वर बाळासाहेब नळगिरे नांदेड यांनी पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्यांचा मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल आभार मानले.

पोलिस आयुक्तालयासाठी प्रस्ताव द्या 

नांदेड जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे. आणि ज्या भागात सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे. त्या ठिकाणाबाबतचे नियोजन करुन जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा पाठपुरावा करावा. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा. तसेच पोलीस वसाहतीबाबतही सकारात्मक विचार करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या पाहता याठिकाणी पोलीस आयुक्तालय आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

पोलिस अधिकार व कर्मचाऱ्यांचे परिश्रम

पोलिस उपाधीक्षक (शहर) अभिजीत फस्के, धनंजय पाटील, उत्तम मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर, जिल्हा विशेष शाखेचे प्रशांत देशपांडे, संजय ननवरे, अनिरूध्द काकडे, प्रदीप काकडे, अनंत नरुटे, पंडीत कच्छवे, संदीप शिवले, जनसंपर्क अधिकारी रामेश्‍वर कायंदे, पांडूरंग भारती यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 
  
आकडे बोलतात

ँ वजिराबाद- १८ गुन्ह्यात सहा लाख २८ हजार ४९९
ँ भाग्यनगर- आठ गुन्ह्यात नऊ लाख ५१ हजार ३२१ 
ँ विमानतळ- सात गुन्ह्यात दोन लाख ७१ हजार
ँ शिवाजीनगर- १२ गुन्ह्यात २९ लाख ५३ हजार ९०
ँ इतवारा- १८ गुन्ह्यात २२ लाख ६९ हजार १० 
ँ नांदेड ग्रामिण- १६ गुन्ह्यात १२ लाख १० हजार २०० 
ँ कुंटुर- एका गुन्ह्यात पाच हजार ९५५ 
ँ कुंडलवाडी- दोन गुन्ह्यात ३१ हजार ८१७
ँ अर्धापूर- दोन गुन्ह्यात ८२ हजार ७०४
ँ भोकर- चार गुन्ह्यात ८७ हजार ५००
ँ हदगाव- एका गुन्ह्यात १३ हजार ७००
ँ कंधार- दोन गुन्ह्यात ३४ हजार 
ँ लोहा- दोन गुन्ह्यात सहा हजार 
ँ हिमायतनगर- एका गुन्ह्यात चार हजार २००
ँ नायगावमध्ये एका गुन्ह्यात १७ हजार 
असा ९५ गुन्ह्यात ८५ लाख ६५ हजार ६९९ रुपयाचा ऐवज परत केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

SCROLL FOR NEXT