file photo 
मराठवाडा

नांदेडकरांना आता रहावे लागणार आणखी दक्ष...

अभय कुळकजाईकर

नांदेड -  नांदेडला एक महिन्यात लॉकडाउन काळात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्यामुळे ता. २२ मार्च ते ता. २१ एप्रिलपर्यंतची परिस्थिती दिलासादायक होती. पण बुधवारी (ता. २२) नांदेड शहरामध्ये पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे आता नांदेडकरांना आणखी दक्ष रहावे लागणार आहे. जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन आत्तापर्यंत तब्बल महिनाभर कोरोनाला नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर थोपवून धरण्यात जिल्हा प्रशासनाने यश मिळवले होते. मात्र, महिनाभरानंतर बुधवारी (ता. २२) एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. तरी देखील जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना विरुद्ध जगभरात लढाई सुरु आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही ता. तीन मे पर्यंत लॉकडाउन आहे. नांदेडला देखील गेल्या महिन्याभरापासून जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महापालिका त्याचबरोबर पालकमंत्री, खासदारांसह इतर लोकप्रतिनिधी या सर्वांनी सामुहिक प्रयत्न केले. त्यामुळे महिनाभरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. अखेर महिनाभरानंतर बुधवारी (ता. २२) एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 

जनतेने घरातच राहून सहकार्य करावे
नांदेड शहरातील पिरबुऱ्हाननगर भागात ६४ वर्षीय कोरोनाचा संशयित रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पिरबुऱ्हाणनगर व आजूबाजूचा पाच किलोमीटरचा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. हा रुग्ण सोमवारी (ता. २०) दुपारी शासकीय महाविद्यालयात ताप, खोकला व दम लागण्याच्या तक्रारीमुळे दाखल झाला होता. या रुग्णावर उपचार सुरु असून पिरबुऱ्हाणनगर व आसपासचा पाच किलोमीटरचा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे.

महत्वाच्या उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि पुढील उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सील केलेल्या भागात तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली असून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. 

रस्त्यावरील वर्दळ झाली कमी 
दरम्यान, आत्तापर्यंतच्या झालेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. सध्या पिरबुऱ्हाणनगर आणि आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला असून पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर शहरातील रस्त्यावरील गर्दीही काल, परवाच्या तुलनेत बुधवारी (ता. २२) अत्यंत कमी झाल्याचे दिसून आले. अनेक रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत होता.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Sangli Miraj Kupwad Politics : जयंत पाटील–विश्वजीत कदम–विशाल पाटील एकत्र; महायुतीचा गेम! दोन माजी महापौरांना लावले गळाला

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT