file photo
file photo 
मराठवाडा

नांदेडकरांचे बदलत्या राजकीय घडामोडींवर लक्ष

अभय कुळकजाईकर

नांदेड : भाजपने सत्ता स्थापनेचा दावा रद्द करत शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टोलवल्यानंतर राज्यपालांनी आता शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींवर नांदेडकर लक्ष ठेऊन आहेत. त्याचबरोबर आता कॉंग्रेसची भूमिकाही महत्त्वाची असून, आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जिल्ह्यात विधानसभेच्या नऊ जागा असून त्यापैकी भाजप व मित्र पक्षाला चार, कॉंग्रेसला तीन, तर शेकाप आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. भाजप मित्र पक्षासोबत सध्या शेकाप असल्याने त्यांचा जागा पाच झाल्या आहेत. शिवसेनेने पाठिंबा दिला नसल्याने भाजपने सरकार स्थापनेस नकार दिला आहे. आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत राहणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.


दरम्यान, नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, रावसाहेब अंतापूरकर आणि मोहन हंबर्डे हे तीन आमदार असून राष्ट्रवादीला मात्र एकही जागा मिळाली नाही. तर दुसरीकडे शिवसेनेचे बालाजी कल्याणकर हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. आता राज्यात काय घडामोडी होणार आणि त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का? याची चर्चा नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही सुरू झाली आहे.


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीसोबत चर्चा करून आम्ही पुढील निर्णय घेऊ, अशी सावध प्रतिक्रिया दिली असून आता सत्ता स्थापनेत कॉंग्रेसची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. एकूणच राज्याच्या राजकारणात आता काय घडणार? याकडे जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नांदेडकरांचेही लक्ष लागले आहे.

कोण काय म्हणाले?

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही सर्वांनी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले असून आम्ही सर्व जण त्यामुळे आनंदित झालो असून आता शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे. राज्यातील जनतेसोबतच आम्हीदेखील शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत.
- दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
 

पक्षश्रेष्ठींचा आदेश मान्य


शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळी घेतील. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार आहोत. त्यामुळे ते जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून त्यात शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा पुढील निर्णय आता पक्षश्रेष्ठी घेतील.
- गोविंद शिंदे नागेलीकर, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT