nanded photo 
मराठवाडा

Video - नांदेडची राधिका रोवणार जपानमध्ये भारतीय संस्कृतीचा झेंडा

शिवचरण वावळे

नांदेड : नांदेडच्या किड्स किंगडम शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत अससेल्या राधिकाची आशिया काळेहाशी प्रकल्पांतर्गत जपान येथे दहा महिण्यासाठी सांस्कृतिक प्रशिक्षणासाठीचे निमंत्रण तिला मिळाले आहे.

राधिका लवकरच जपानमध्ये जाऊन भारतीय संस्कृतीबद्दल विविध देशातील विद्यार्थ्यांना माहिती देण्यासोबतच इतर देशाची भाषा-संस्कृती बद्दल जाणून घेणार आहे. या प्रल्पासाठी देशभरातील १६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पाच विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राधिका काकाणी ही निवड झालेली मराठवाड्यातील एकमेव विद्यार्थीनी आहे.

हे वाचा - नांदेडच्या ‘या’बारमध्ये क्रिकेटचा सट्टा

किंड्‍स किंगडम ही ब्रिटीश कॉन्सिल संस्थेशी संलग्नित शाळा असल्याने या शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतात. अमेरिकन फिल्ड सर्व्हिस (एएफएस) प्रकल्पासाठी आक्टोबर २०१९ मध्ये शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी ही आॅनलाइन परीक्षा दिली होती. यात राधिका काकाणी या एकमेव विद्यार्थीनीची निवड झाल्याची माहिती शाळेकडे कळविण्यात आली आहे.

दरम्यान, राधिका काकाणी ही मार्चमध्ये शेवटच्या आठवड्यात नांदेडहून दिल्ली येथे जाणार असून, निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची दिल्ली मध्ये दोन दिवसांच्या मार्गदर्शन शिबिरानंतर ती जपानला रवाना होणार आहे. दहा महिण्याच्या या कल्चरल प्रोग्राम दरम्यान तिच्या निवासाचा, जेवणाचा संपूर्ण खर्च जपान सरकार करणार आहे. या दहा महिण्यात तिला विविध देशातील विद्यार्थ्यांचे कल्चर, संस्कृती, भाषा व इतर अनेक गोष्टींची देवाण घेवाण करता येणार आहे.

हेही वाचा - माहूरगडाचा विकास ‘या’ तिर्थक्षेत्रांच्या धर्तीवर होणार

जपानकडे एएफएसचे नेतृत्व
अमेरिकन फिल्ड सर्व्हिस (एएफएस) च्या वतीने दरवर्षी विविध देशातील विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा घेऊन त्याद्वारे त्यांची भाषासंस्कृती, शिक्षण संस्कृतीची आदान प्रदान व्हावी या हेतुने दरवर्षी विविध देशातील विद्यार्थ्यांची निवड करुन त्या देशाकडे प्रतिनिधित्व सोपवले जाते. या वर्षी अमेरिकन फिल्ड सर्व्हिस (एएफएस) चे नेतृत्व जपान या देशाकडे सोपविण्यात आले आहे.

हेही वाचलेच पाहिजे असे मिळतेय मातृत्वाला वरदान

घर आणि शाळेकडून प्रोत्साहन
राधिका ही अभ्यासात हुशार असून तिला विविध देशाच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची बालपणापासूनच आवड होती. यासाठी तिला परिवार आणि शाळेतुन नेहमीच प्रोत्साहन मिळत आले असून, तिची निवड झाल्याने तिने विविध देशाची संस्कृती जाणून घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राधिकाला जपानला जाण्यासाठी किंड्‍स किंग्डम शाळेच्या संध्या माहेश्वरी, प्राचार्य सुनिल श्रीवास्तव यांच्यासह घरातील सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT