navratri
navratri  sakal
मराठवाडा

Navratri Festival 2023 : श्री रेणुका मंदिर पायथ्यावर दिवे-कापूर लावण्यास मनाई....

साजीद खान

नवरात्र उत्सव दरम्यान मंदिर प्रशासन भाविकांसाठी सकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवणार

माहूर - महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या श्री रेणुका देवी मंदिर व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पायऱ्यावर दिवे-कापूर लावण्यास सक्त मनाई असणार आहे.या सह सर्वच सबंधित विभागानी यात्राकाळात योग्य नियोजन ठेवावे अशा सूचना श्री रेणुका देवी संस्थानाचे सचिव तथा किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन् एस यांनी दिल्या.

आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज (ता.९) सोमवार रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन् एस. यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या वेळी तहसीलदार किशोर यादव,नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,मुख्याधिकारी डॉ.राजकुमार राठोड,उपविभागीय पोलिस अधिकारी सदानंद शिंनगारे,तालुका आरोग्य अधिकारी माचेवार यांची प्रमुख होती.

शारदीय नवरात्र उत्सव दरम्यान मंदिर प्रशासन भाविकांसाठी सकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवणार असून भाविकांची गर्दी बघून दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे सोबतच लोकांसाठी आरओ चे पाणी महाप्रसाद व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंसेवक आणि वाकी टाकी सज्ज असल्याचे विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय कान्नंव यांनी सांगितले.तर नगरपंचायत प्रशासनाकडून वाहनतळ,पिण्याचे पाणी,स्वच्छता,एक टँकर,चार घंटागाडी २५ कर्मचारी,मोबाईल टॉयलेट,सह मोकाट जनावरांवर कार्यवाही आणि प्लास्टिक बंदी सह भाविकांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.

राजकुमार राठोड व कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली.तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून चार पथक,७० सज्ज असणार आहे, तीन रुग्णवाहिका १६ वैद्यकीय अधिकारी २० नर्स,२२ इतर कर्मचारी असा ताफा व आवश्यक असणारे औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने ३० बेड चे अतिदक्षता वार्ड आणि दोन १०८ रुग्णवाहिका आणि आवश्यक तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.राज्य परिवहन महामंडळाकडून १०० बसेसची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात येणार आहे.

वीज वितरण कंपनीने यात्रा काळात विजेची समस्या उद्भवू नये म्हणून सारखणी गुंज आणि किनवट वरून अतिरिक्त व्यवस्था केली असल्याची माहिती उपविभागीय अभियंता यांनी दिली. पोलीस विभागाकडून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने ३ उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक २२ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक २२० कर्मचारी ६५ महिला कर्मचारी ४० वाहतूक कर्मचारी २०० पुरुष होमगार्ड व १०० महिला होमगार्डची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.

अनुसया दत्त शिखर दरम्यानचा अरुंद रस्ता यात्रेपूर्वी दुरुस्त करणे आवश्यक असल्याने त्या दिशेने काम सुरू असल्याचे व विश्रामगृह येणाऱ्या व्हीआयपी च्या सुविधेसाठी सज्ज असल्याचे सहाय्यक अभियंता आकाश राठोड यांनी सांगितले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी रमेश गावंडे,आगार प्रमुख चव्हाण,सहाय्यक आगर प्रमुख चंद्रशेखर समरथवार,व्यवस्थापक योगेश साबळे,शाखा अभियंता आकाश राठोड,सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शिवाजी साळुंखे,नगरपंचायतचे अधीक्षक वैजनाथ स्वामी,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री.पवार यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख,प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देणगी खाजगी व्यक्तींच्या हातात दान देण्या ऐवजी ऑनलाईन देण्याचे आवाहन

नवरात्र काळात व इतर वेळेसही श्री.रेणुका देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी संस्थान च्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने माती चरणी आपले दान अर्पण करावे,खाजगी व्यक्तींच्या हातात दान देण्याचे टाळावे असे आवाहन केले,सोबतच मंदिर परिसरात देणगी काउंटर असून त्या ठिकाणी स्कॅनर लावले आहे,त्याचा वापर करावा असे ही संस्थांन चे पदसिद्ध सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन् एस.आवाहन केले आहे.

भाविकांना मातेच्या मुखदर्शनाकरिता मोठ्या एलसीडीची व्यवस्था

श्री रेणुका देवी संस्थाने भाविकांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था,भाविकांना मुखदर्शनाकरिता मोठ्या एलसीडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नऊ दिवस महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे.अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी,विश्वस्त संजय काण्णव,व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली.

अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती; प्लास्टिक बंदी

नगरपंचायत कार्यालयाने वाहनतळ, स्वच्छतागृह,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेकरिता अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर नऊ दिवस २४ तासाकरिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून शहरात पूर्णपणे प्लास्टिक बंदी असल्याकारणाने स्थानिक दुकाने व प्रतिष्ठानांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

डॉ.राजकुमार राठोड,

मुख्याधिकारी,नगर पंचायत,माहूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT