NCP Surekha Lahane Elected As City President Of Jafrabad Nagar Panchayat esakal
मराठवाडा

जाफराबाद नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुरेखा लहाने

काँग्रेसचे दोन सदस्य व एक अपक्ष सदस्याचे समर्थन मिळवत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला

गजानन उदावंत

जाफराबाद (जि.जालना) : जाफराबाद नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा लहाने यांची निवड झाली. नगरपंचायतच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रकिया दरम्यान अपक्ष, भाजप, काँग्रेसच्या नगरसेवक गैरहजर असल्याने गणपूर्ती नऊ सदस्यांची झाल्याने सुरेखा लहाने यांची निवड करण्यात आली आहे. जाफ्राबाद नगरपंचायत निवडणुकीत (Jafrabad Nagar Panchayat Election) काँग्रेस-०६, राष्ट्रवादी-०६, भाजप-०१, अपक्ष-०४ असा संख्याबळ असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसचे दोन सदस्य व एक अपक्ष सदस्याचे समर्थन मिळवत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी राष्ट्रवादीकडून (NCP) सुरेखा लहाने यांनी, तर अपक्ष म्हणून कविता वाकडे आणि मीराबाई जैस्वाल यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. (NCP Surekha Lahane Elected As City President Of Jafrabad Nagar Panchayat)

अध्यक्षपदाच्या प्रक्रिया दरम्यान विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार कविता वाकडे आणि मिराबाई जैस्वाल या उमेदवार देखील अनुपस्थिती असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा लहाने यांची बाजूने नऊ मते पूर्ण झाल्याने अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कानडे यांनी दिली. दरम्यान दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) वतीने जिल्हाधिकारी यांना नऊ सदस्य असलेला गट नेता ठरवण्यात आला आहे.

मात्र जिल्हाधिकारी यांनी काँग्रेसचे दोन आणि एक अपक्ष सोबत नसल्याने ७ जणांचा गटनेता म्हणून मान्यता दिली. या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आलीय. यावर निर्णय न्यायालयाने पक्षाच्या उमेदवारांबाबत जिल्हाधिकारी यांनी नव्हे तर पक्षांनी निर्णय घायचा असतां अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. (Jalna)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT