file photo 
मराठवाडा

समाधानी जीवन जगण्याची गरज, कशासाठी? ते वाचाच

प्रमोद चौधरी

नांदेड : ‘ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ या उक्तीप्रमाणे सहनशीलता, इंद्रियांवर निग्रह, क्रोधावर नियंत्रण, क्षमाशील वृत्ती असायला हवी. अर्थातच ‘सशक्त मनाचे सकारात्मक चिंतन’ हाच खरा यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. आणि हा मुलमंत्र जपण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

अध्यात्मिक गुरू आणि ताणतणावावर युवकांना मार्गदर्शन करणारे भैय्यू महाराज, सुपरकॉप म्हणून ओळख असलेल्या हिमांशु राय यांनी काही वर्षांपूर्वी केलेली आत्महत्या बघता कुठेतरी, काहीतरी नक्कीच चुकत आहे. असं काय झालं होतं की, त्यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. ताणतणावाचे व्यवस्थापन सांगणाऱ्या या व्यक्तींच्या मनात प्रचंड तणाव थैमान घालत होतं, हे कुणीच कसं बघितलं नाही. का त्यांना यातून मोकळं होता आलं नाही, असे असंख्य प्रश्‍न समाजव्यवस्थेला आजही भेडसावत असल्याचे दिसत आहे.

खरे म्हणजे अस्थिर चित्तच मानसिक विकासात मोठी बाधा निर्माण करीत असते. आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. वाढलेल्या महत्त्वाकांक्षा, भौतिक गरजांचा डोंगर पार करण्यासाठी शारीरिक, मानसिक व सामाजिक संतुलन बिघडत चालले आहे. भौतिक सुखाच्या लालसेपोटी अनेकांनी आपले जीवन उद्‍ध्वस्त केले आहे. तर काहींनी नैराशेपोटी मरणाला जवळ केले. मनाची अस्थिर अवस्था हेच याचे महत्त्वाचे मूळ कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.

सशक्त मनासाठी सर्वसामान्य जीवन सुखा-समाधानाचे जीवन जगणे आज महत्त्वाचे ठरेल. चिंतनाने व्यक्तीला समाजामध्ये एकरूप होऊन राहता येते. त्यामुळए चिंतन करण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे मन अशक्त आहे. कमकुवत, अस्थिर आहे अशांनी घुसमटू नका, विचारांना प्रकट करा, भावनांना मोकळी वाट करून मनातील अपप्रवृत्तींचा निचरा करायला पाहिजे.

जीवन आहे नदीच्या प्रवाहाप्रमाणे
आपल्या भावना जीवाभआवांच्या व्यक्तींजवळ व्यक्त केल्या असत्या तर भैय्यू महाराज, हिमांशुराय यांच्यावर आत्महत्येची वेळच आली नसती. जीवन जगताना प्रत्येकाच्या मनावर ताण पडतोच, म्हणून काय आत्महत्या करायची का? आपलं जीवन नदीसारखे असले पाहिजे. वाहताना पहाडसमोर आल्यामुळे ती आपलं वाहणं थांबवत नाही. तर आपले वळण बदलून पुन्हा ती प्रवाहीत होत असते. म्हणजेच नदी जर सकारात्मक विचार करते तर आपण का नाही? याचे चिंतन करणेच योग्य ठरेल. नव्हे ती आज काळाची गरज आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

U19 Asia Cup: १७ चौकार, ९ षटकार अन् डबल सेंच्युरी! भारताच्या अभिज्ञान कुंडूने रचला इतिहास, कोणालाच न जमलेला केला पराक्रम

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : लातूर तालुक्यात डोंगर पोखरून जमिनीची चाळण; तहसीलदारांचे दुर्लक्ष, मंत्री बावनकुळे आज लातूर दौऱ्यावर, कारवाई होणार का?

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT