Beed Crime News esakal
मराठवाडा

जुन्या वादातून शेजाऱ्याचा काढला काटा, बाप-लेकांवर आष्टी पोलिसांत गुन्हा

जुन्या वादातून शेजाऱ्यानीच शेजाऱ्याचा काढला काटा

अनिरुध्द धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : तालुक्यातील वाळुंज येथे बुधवारी संशयास्पदरित्या आढळलेल्या मृतदेहाच्या खुनाचे गूढ उकलण्यात आष्टी पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून शेजाऱ्यानीच शेजाऱ्याचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी बाप-लेकांसह तिघांवर आष्टी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.२०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय भैरवनाथ गावडे (वय ५५, रा. वाळुंज) असे मृताचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, आष्टी (Ashti) तालुक्यातील वाळुंज येथे राहणारे दत्तात्रय भैरवनाथ गावडे यांचा मृतदेह बुधवारी वस्तीजवळील मक्याच्या शेतात आढळून आला होता. प्राथमिक तपासात पोलिसांना खुनाचा प्रकार असल्याचे पुरावे मिळाले होते. (Neighbour Killed Man In Ashti Of Beed)

तसेच कुटुंबीयांनीही घातपाताचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, मंगळवारी (ता.१९) घराबाहेर पडलेले गावडे घरी परतले नाहीत. बुधवारी सकाळी गावाशेजारील शेतात गावडे यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. पाहणीत मृतदेहाजवळ रक्ताने माखलेल्या विटा आढळून आल्या. श्वानपथकाने शेजाऱ्यांच्या घरापर्यंत माग काढला होता. पोलिस तपासात गावडे यांच्या शेजारील खाडे कुटुंबाची चौकशी केली असता विसंगत उत्तरे मिळाली. त्यानंतर तिघे खाडे बापलेक फरारी झाले. तपासात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून तिघा बापलेकांनी शेजाऱ्याचा विटांनी ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. (Beed)

शेजारी राहणारे विश्वनाथ मुरलीधर खाडे, अमोल विश्वनाथ खाडे, अजय विश्वनाथ खाडे या बापलेकांसोबत सहा महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावरून खाडे पितापुत्र रागात होते. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्याचा काटा काढला. या संदर्भात मृताचा भाऊ दिगंबर भैरवनाथ गावडे यांच्या फिर्यादीवरून विश्वनाथ मुरलीधर खाडे, अमोल विश्वनाथ खाडे, अजय विश्वनाथ खाडे या बापलेकांवर बुधवारी रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशीवकर, प्रभारी पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांनी पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT