उमरगा : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा सत्कार करताना अमोल मोरे. या वेळी अश्‍लेष मोरे, प्रा. सुरेश बिराजदार, प्राचार्य डॉ. घनशाम जाधव, प्रा. व्ही. एम. पाटील आदी.
उमरगा : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा सत्कार करताना अमोल मोरे. या वेळी अश्‍लेष मोरे, प्रा. सुरेश बिराजदार, प्राचार्य डॉ. घनशाम जाधव, प्रा. व्ही. एम. पाटील आदी. 
मराठवाडा

उमरगा : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा सत्कार करताना अमोल मोरे.

सकाळ वृत्तसेवा

उमरगा (उस्मानाबाद) : राज्यातील कोणतेही गडकोट किल्ले हॉटेल्स्‌, हेरीटेज अथवा लग्न समारंभासाठी किरायाने देऊ नयेत. रायगड किल्ल्यावर आमचे प्रेम आहे, रायगड किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांचे संवर्धन व सुशोभीकरण करावे, असा सल्ला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला दिला आहे. 


खासदार संभाजीराजे छत्रपती हे रविवारी (ता. आठ) कार्यक्रमानिमित्त बसवकल्याणकडे जात असताना शहरात थांबले होते. या वेळी भारत शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा अध्यक्ष अमोल मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात खासदार छत्रपती यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अश्‍लेष मोरे, संचालक प्रा. सुरेश बिराजदार, प्रा. व्ही. एम. पाटील, प्राचार्य डॉ. घनशाम जाधव यांची उपस्थिती होती. 
राज्यातील 80 संरक्षक किल्ल्यांपैकी 40 किल्ले राज्य सरकार, तर 40 किल्ले केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत. राज्यातील दहा किल्ल्यांच्या पुनर्वसनाकरिता केंद्र सरकारकडे शंभर कोटींची मागणी केली आहे. हा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. या निधीतून सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, विदर्भातील काही किल्ले, पन्हाळा यासह दहा किल्ल्यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील कोणतेच गडकिल्ले लग्न समारंभ, हॉटेल्स, हेरीटेजेससाठी देण्यास आमचा विरोध आहे. गेल्या चार वर्षांपासून सरकारला कुठलेही किल्ले भाडे तत्त्वावर द्यायचे नाहीत, असेच सांगत आलो आहे. सरकारला हॉटेल्स, हेरीटेज, सांस्कृतिक सभागृह उभी करायची असतील तर गडकिल्ल्यांच्या पायथ्याला करावेत, असे खासदार छत्रपती यांनी सांगितले. 


दरम्यान, येथील शिवसेना भवन येथे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी खासदार छत्रपती यांचा सत्कार केला. या वेळी नितीन होळे, विवेक हराळकर, संतोष सगर, अमर देशटवार, महेश शिंदे, संजय देशमुख, श्रीकांत पतगे, काशीनाथ पाटील आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT