उमरगा : दत्ता रोंगे, राजेंद्र उबाळे यांनी सोमवारपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन व हलगी नाद आंदोलन सुरू केले.
उमरगा : दत्ता रोंगे, राजेंद्र उबाळे यांनी सोमवारपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन व हलगी नाद आंदोलन सुरू केले.  
मराठवाडा

बेमुदत धरणे, हलगी नाद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लोकशाहीर अण्णा भाऊ नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, दलित वस्तीतील स्मशानभूमीऐवजी सौर ऊर्जाचे पथदिवे इतरत्र बसविण्यात आल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, पालिकेत झालेल्या 95 लाख रुपयांच्या अपहाराचा तपास गुन्हे अन्वेषन शाखेतर्फ योग्य दिशेने होत नसल्याने सीआयडीमार्फत तपास करण्यासह शहरातील विविध न्याय मागण्यासाठी माजी नगरसेवक दत्ता रोंगे, राजेंद्र उबाळे यांनी सोमवारपासून (ता. 27) उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन व हलगी नाद आंदोलन सुरू केले आहे.


उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेची सखोल चौकशी करण्यात यावी, 2018-19 मध्ये एक कोटी नऊ लाख 21 हजार 658 रूपयांच्या बेकायदेशीर गौण खनिजाची विल्हेवाट लावण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, पतंगे रस्त्याचे काम मंजूर होऊन सहा महिने झाले तरी कामाची सुरुवात होत नसल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, शहरात लघू शंकेसाठी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी, शहरातील विविध विकासकामांसाठी काढण्यात येणाऱ्या निविदा व ई-निविदा ठराविक कोड टाकून काढण्यात येताहेत.

राज्यस्तरीय दैनिकामध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात याव्यात जेणेकरून चांगल्या दर्जाचे काम करणारे ठेकेदार उपलब्ध होतील. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत तीन वर्षात झालेल्या खर्चाची सखोल चौकशी करण्यात यावी. शहरातील स्वच्छतेचे कंत्राट लातूरच्या जनआधार सेवाभावी संस्थेला तीन वर्षाकरीता नियमबाह्य देण्यात आला आहे, याची सखोल चौकशी करण्यासह अन्य मागण्यांसाठी माजी नगरसेवक दत्ता रोंगे, आरटीआय कार्यकर्ते राजेंद्र उबाळे यांनी सोमवारपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन व हलगी नाद आंदोलन सुरू केले आहे.

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष सुभाष सोनकांबळे, युवा भिमसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय क्षिरसागर, मनसेचे शहराध्यक्ष राजू चुंगे यांच्यासह मनोज जाधव, अशोक सुर्यवंशी, पंडीतराव धायगुडे, परमेश्वर बोधे, यादव हिराळे, मशाक चिट्टेवाल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला. दरम्यान भाजपाचे नगरसेवक इराप्पा घोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाल पाठिंबा जाहीर केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT