भूम : हांगेवाडीतील दारूड्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देताना विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक आदी.  
मराठवाडा

जिल्हा परिषद शाळेत दारूड्याचा धिंगाणा

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळेत एका दारूड्याने चांगलाच धिंगाणा घातला आहे. अरेरावी करीत शिक्षकाला दमदाटी केल्याने विद्यार्थ्यांनी या दारूड्याचा धसका घेतला आहे. हांगेवाडी (ता. भूम) येथे सोमवारी (ता. दहा) हा प्रकार घडला. दरम्यान, याप्रकरणी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
हांगेवाडीत पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा असून, दोन शिक्षक आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली होती. शाळेत एकूण 18 विद्यार्थी होते. सकाळपासून शाळेचे कामकाज व्यवस्थित सुरू होते. दुपारी तीन ते चारच्या सुमारास एकजण शाळेत दारू पिऊन आला.

शिक्षक महादेव बोंदर यांच्या शर्टाला धरून दमदाटी करू लागला. दारूड्याने हैदोस घातल्याने शाळेतील विद्यार्थीही भयभीत झाले. बघून घेतो, अशी धमकी देत अर्वाच्य भाषेत बोलू लागल्याने शाळेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकारानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी तहसीलदारांच्या दालनात जाऊन व्यथा मांडली. शिवाय भूम पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दारूड्या हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याचा धसका शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घेतल्याने चर्चा आहे.

 
दरम्यान, शाळेत विद्यार्थ्यांसमोर असा धिंगाणा घालणाऱ्या दारुड्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा प्रकार समजल्यानंतर पालकांनीही तीव्र संताप व्यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT