संग्रहित चित्र. 
मराठवाडा

रेड झोन जिल्ह्यातून आता नो एन्ट्री 

उमेश वाघमारे

जालना - रेड झोन जिल्ह्यातून येणाऱ्यांना जालना जिल्ह्यात आता एन्ट्री दिली जाणार नाही. तसेच वैद्यकीय कारणामुळे किंवा अत्यावश्यक कामांमुळे जिल्हा पोलिस प्रशासनाची परवानगी घेऊन रेड झोन जिल्ह्यात गेलेल्या व्यक्तींची जिल्ह्यात दाखल होताच कोरोनाची चाचणी होईल. त्यांना १४ दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी सांगितले आहे. 

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. राज्यात ही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रत्येक दिवस वाढ होत आहे. अशात राज्यात ज्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही तेथे ग्रीन झोन, ज्या जिल्ह्यात कमी रुग्ण आहेत तेथे ऑरेंज झोन आणि ज्या जिल्ह्यात १५ पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत ते जिल्हे रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

जालन्यात एक कोरोना बाधित महिला रुग्ण आढळून आल्याने जालना जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये, म्हणून पोलिसांनी कंबर कसली आहे.  जालना जिल्ह्यालगत असलेला औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. या दोन जिल्ह्यातील या-ना त्या कारणाने अनेक जण ये-जा करत असतात. मात्र आता रेड झोन जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला जालना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही.

जालना जिल्ह्यातून रेड झोन जिल्ह्यात वैद्यकीय किंवा अत्यावश्यक कामांसाठी जालना पोलिसांची परवानगी घेतलेल्या व्यक्तींना जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले जाईल. तेथे कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. तसेच त्या व्यक्तीच्या हातावर १४ दिवस होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जाणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घरातच राहणे अपेक्षित आहे. 

या पुढे रेड झोन जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात येण्याची परवाना असली तरी देखील एकाही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. केवळ जालना पोलिसांची परवानगी असेल तरच त्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल. तसेच मेडिकल किंवा अति महत्त्वाच्या कामानिमित्त जालना पोलिसांच्या परवानगी घेऊन रेड झोन जिल्ह्यात गेलेल्या व्यक्तीला जिल्ह्यात आल्यानंतर आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोनाची तपासणी करून होम क्वारंटाइनचा त्या व्यक्तीच्या हातावर शिक्का मारला जाणार आहे. 
- चैतन्य एस, 
पोलिस अधीक्षक, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली; HDFC ला मोठा धक्का

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT