high Court Aurabgabad News  
मराठवाडा

उस्मानाबादच्या शिक्षणाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने का बजावली नोटीस? 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेच्या संदर्भातील आदेशाचा अवमान केल्याप्रकरणात उस्मानाबादच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (माध्यमिक) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी नोटीस बजावली आहे. 

याप्रकरणी लक्ष्मण चंदू राठोड यांनी ऍड. रामराव बिरादार यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्यानुसार लक्ष्मण राठोड हे उमरगा तालुक्‍यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण सेकंडरी ऍण्ड हायर सेकंडरी स्कूलमध्ये 1 जुलै 1987 पासून कार्यरत आहेत. त्याच संस्थेत शिक्षक शिवानंद बुदाले हे 2 जुलै 1990 पासून कार्यरत आहेत. यामध्ये राठोड यांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकपदी नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी राठोड यांच्याऐवजी बुदाले यांच्या मुख्याध्यापकपदावर शिक्कामोर्तब केले.

यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने 21 जानेवारीरोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणी घ्यावी, तसेच सेवा ज्येष्ठता यादी दोन महिन्याच्या आत ठरवून घेऊन संबंधित प्रकरणाच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता. त्यानुसार सुनावणी न घेता बुदाले यांना मुख्याध्यापकपदी नियुक्तीचा आदेश काढला. त्यावर लक्ष्मण राठोड यांनी खंडपीठाच्या आदेशाची अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली असून खंडपीठाने वरील आदेशानुसार नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी पाच आठवड्यांनी अपेक्षित आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Ambegaon gas distribution: ‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम: आंबेगाव तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर अवसरी खुर्दमध्ये सव्वा महिन्यानंतर गॅस टाक्यांचे वितरण सुरू

SCROLL FOR NEXT