File photo 
मराठवाडा

वरली मटकाही झाला आता हायटेक : काय आहे नवीन शक्कल

प्रमोद चौधरी

नांदेड : तंत्रज्ञानाचा वापर करण्यात गुन्हेगार पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे सरकले आहेत. भामटे कोट्यवधी रुपयांचा आॅनलाईन गंडा घालूनही सहजासहजी पोलिसांच्या हाती लागत नाही. आता सट्टापेढी चालवणाऱ्यांनीही तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे सट्ट्याच्या चिठ्ठ्या पूर्णपणे हद्दपार झाल्या असून व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून आकडे घेतले जात आहेत. अशा भामट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर येऊन ठेपले आहे.   

चिठ्ठीचा सट्टा होतोय कालबाह्य
बुकींकडून आता कोणत्याही प्रकारची चिठ्ठी सट्टा खेळणाऱ्यांना दिली जात नाही; परंतु स्वतःजवळ मोबाईल नसलेले असंख्य लोकही सट्टा खेळतात. हे अशिक्षित लोक पूर्वीप्रमाणेच कागदावर आकडे व स्वतःचे नाव लिहून आणतात. या कागदाचा फोटो बुकी मोबाईलमध्ये काढून घेतात. यानंतर लागलीच कागद फाडून टाकत पुरावा मिटवला जातो. आकडे लागल्यानंतर याच फोटोच्या आधारे पुढील व्यवहार होतात. पूर्वी एखाद्या अडगडीच्या ठिकाणी बसून सट्टा घेतला जात होता. त्यामुळे पोलिस छापा मारु शकत होते. आता बुकी कोण आहेत, याचा शोध लागणे कठीण झाले आहे.

योग्य दिशेने तपास व्हावा
प्रमुख बुकींची अनेक लोक शहरात मोबाईलच्या माध्यमातून सट्टा घेत आहेत. या लोकांचे नाव समजल्यास पोलिस त्यांची तपासणी, चौकशी करून कारवाई करू शकतात. बुकींवर कारवाई ताब्यात घेऊन तपासणी केल्यावर हे रॅकेट हाती लागू शकते. फक्त त्या दिशेने तपास होणे आवश्‍यक आहे. 

असे अडकू शकतात बुकी
शहरात सट्टा काहीअंशी प्रमाणात बंद असल्याचा दावा पोलिस प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, तंत्रज्ञानाचा वापर करून सट्टा खेळवला जात असल्याचे चित्र आजही आहे. त्यामुळे पोलिसांचा दावा फोल ठरू शकतो. यापूर्वी सट्टापेढी चालवणाऱ्यांवर अनेकवेळा कारवाई झालेली आहे. आजही होत आहे.  या सर्वांना पुन्हा एकदा अकस्मातपणे तपासल्यास यातून अनेक बुकी पोलिसांना मिळू शकतील, यात तीळमात्र शंका नाही.

असा खेळवला जातोय मोबाईलवर सट्टा
बुकींचा व्हाॅट्सअॅप नंबर खेळणाऱ्यांना दिला जातो. खेळणारे दररोज बुकीला व्हाॅट्सॲपवरून आकडे पाठवतात. दोघांच्या मोबाईलमध्ये हा रेकाॅर्ड सेव्ह असतो. ज्यांचे आकडे लागतात, ते पुन्हा मेसेज करून कन्फर्म करून घेतल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी पैशांची देवाण-घेवाण होते. सुरक्षेचा उपाय म्हणून बुकी एका मोबाईलमध्ये आलेले सर्व रेकाॅर्ड, मेसेजेस दुसऱ्या नंबरलाही पाठवून ठेवतात. व्यवहार झाल्यानंतर दररोजचे मेसेज डिलीट केले जातात. त्यामुळे मागच्या दिवसाच्या कोणताही पुरावा शिल्लक राहत नाही. त्यामुळे पुरावे सापडणे अवघड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल ते मोठा नेता भ्रष्टाचारात अडकणार? काय सांगतं राजकीय भविष्य?

Ranji Trophy: अजिंक्य रहाणे - ऋतुराज गायकवाडचा शतकी धमाका; मुंबई - महाराष्ट्र संघांना सावरलं

US Immigration Rule: अमेरिकेचा अजून एक मोठा धक्का! परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले, आता प्रवेशासाठी 'ही' गोष्ट आवश्यक

Crime News : मानवतेला काळिमा फासणारी घटना! बापाने स्वत:च्याच दोन मुलींना संपवलं, धक्कादायक कारण समोर...

Vani News : नुकसानग्रस्त शेतकरी, द्राक्षबागांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहिर करुन नुकसान भरपाईसह... नाशिक-कळवण रस्ता चौपदरीकरणाची खा. भगरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT