chillar  
मराठवाडा

अबब... करापोटी दिली चक्क सोळा हजारांची चिल्लर

कृष्णा ऋषी

औंढा नागनाथ( जि. हिंगोली) : येथील नगर पंचायतीतर्फे मार्च एन्डिंगमुळे घरपट्टी, नळपट्टीसह विविध करांच्या वसुलीचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी (ता. १८) एका थकबाकीदाराने वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातावर कराची तब्बल १६ हजार रुपयांची चिल्लर दिली. चिल्लर मोजताना मात्र, कर्मचारी घामाघूम झाले होते.

औंढा नागनाथ शहरातील नागरिकांकडे नगर पंचायतीची घरपट्टी, नळपट्टी थकीत करापोटी ९८ लाख रुपयांची रक्‍कम येणे बाकी आहे. नगर पंचायतीतर्फे शहरात घरोघरी जाऊन कर्मचारी कराची रक्‍कम वसूल करीत आहेत. आजपर्यंत ६५ लाख रुपयांची वसुली झाली असून बुधवारपर्यंत (ता.२५) वसुली जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्‍यानंतर जप्तीच्या नोटिसा देण्यात येणार आहेत. 

६५ लाख रुपायांची वसुली

दरम्‍यान, पालिका प्रशासनाने कराची रक्‍कम वसुली संदर्भात मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके नेमली आहेत. ही पथके वसुली करीत आहेत. यातील ६५ लाख रुपायांची वसुली झाल्याचे पथक प्रमुख कर निरीक्षक उत्तम जाधव यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेने तयार केलेल्या पथकात श्री. जाधव यांच्यासह हरिहर गवळी, विजय महामुने, विष्णू रणखांबे, मंजुषा राठोड, नलिनी मलमवार, राधा काळे, अनिल नागरे, मनोहर रणखांबे, नागेश गुरुकिल्ले, लतीफ काजी यांचा समावेश आहे. दरम्यान, हे पथक बुधवारी कराच्या थकीत वसुलीसाठी गेले होते. थबबाकीदाराने कर्मचाऱ्यांच्या हातावर तब्बल सोळा हजारांची चिल्लर दिली. या चिल्लरमध्ये एक रुपया, दोन रुपये व पाच रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. हे चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांच्या मात्र चांगलेच नाकीनऊ आले होते.


पोल्‍ट्री व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल

औंढा नागनाथ: तालुक्‍यातील दरेगाव येथील एका पोल्‍ट्री फार्मचालकांविरुद्ध मंगळवारी (ता. १७) औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरेगाव येथील जगदंबा पोल्‍ट्री फार्मचे लक्ष्मण जाधव, दुर्गादास राठोड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (ता.१२) रोजी २१ हजार कोंबड्या जमिनीत पुरल्या असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी, तहसीलदार व पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे दिली होती. तसेच त्‍याचे शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी केली होती. या बाबत जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. 

 प्रशासनाला दिली खोटी माहिती

त्‍यावरून श्री. मुंडे यांनी मंगळवारी (ता. १७) प्रत्‍यक्ष पोल्‍ट्री फार्मवर जावून पाहणी केली असता आठ हजार कोंबड्या जिवंत असल्याचे आढळून आले. त्‍यामुळे कोंबडी उत्‍पादकांना २१ हजार पक्षी खड्ड्यांत गाडल्याची खोटी माहिती दिली असल्याचे निदर्शनास आहे. जेसीबीच्या मदतीने तीन हजार कोंबड्या जमिनीत गाडल्याची माहिती चौकशीत समोर आली. कोंबडी उत्‍पादकाने शासनाकडून अनुदान मिळावे म्‍हणून प्रशासनाला खोटी माहिती देत अनुदानाची मागणी केली. याप्रकरणी लक्ष्मण जाधव, दुर्गादास राठोड या दोघांवर औढा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ए. जी. पठाण हे करीत आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT