gram panchayat election voting 
मराठवाडा

Gram Panchayat Election: खासदारांना विरोधक 'भारी' ठरणार का?

तानाजी जाधवर

उस्मानाबाद: जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतीची निवडणुकांचे आज मतदान होत आहे. 42 गावांनी निवडणुकांपासून अलिप्त राहत बिनविरोधाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीचे घटकपक्ष यांनी भाजपविरुद्ध पॅनेल तयार केला आहे.

शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे मुळ गाव गोवर्धनवाडी येथे निवडणुकीचा फड चांगलाच रंगल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत खासदार निंबाळकर यांनी एकतर्फी विजय मिळवत गावावर वर्चस्व राखल्याचे पाहयला मिळाले आहे. यावेळीही विरोधकानी पूर्ण शक्तीने खासदारांच्या गटाला थोपविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

विरोधकांच्या प्रयत्नांना जनता कितपत प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाच ठरणार आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकांमध्ये हे गाव सेनेला मोठी आघाडी देत आल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाल्यानंतर खासदार निंबाळकरांनी सकाळी मतदान करुन ग्रामस्थासह जिल्ह्यातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजाविण्याबद्दल अवाहन केले आहे.

गावाचा विकास करतील अशा लोकांच्या हातात जनतेनी सत्ता द्यावी असं आवाहनही खा. निंबाळकर यांनी यावेळी केले आहे. जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून ते अबाधित राहिल असा विश्वास खासदार राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT