photo 
मराठवाडा

अफूची दीड हजार झाडे जप्त

विनायक हेंद्रे

आखाडा बाळापूर(जि. हिंगोली): कांदा व लसणाच्या पिकात लावलेली अफूची अंदाजे पंधरा लाख रुपये किमतीची दीड हजार झाडे पोलिसांनी शुक्रवारी (ता.सात) जप्त केली आहेत. कळमनुरी तालुक्यातील भोसी शिवारात शेतकऱ्याने अफूची झाडे लावली होती. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत भोसी शिवारामध्ये कांदा व लसणाच्या पिकात शेतकरी रामदास गमाजी खोकले यांनी अफूची झाडे लावली होती. सध्या ही झाडे सुमारे तीन ते चार फूट उंचीची झालेली आहेत. सर्व झाडांना बोंडेदेखील लागली होती. या प्रकाराची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विकास थोरात, जमादार शेख बाबर, गजानन भालेराव, संजय मार्के, प्रभाकर भोंग, मंडळ अधिकारी रंगनाथ सावंत यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. 

साडेचार किलो वजन

यामध्ये शेतात अफूची दीड हजार झाडे आढळून आली. दरम्यान, पोलिस येत असल्याची माहिती मिळताच रामदास खोकले फरार झाले. पोलिसांनी शेतातील ती झाडे उपटून पोलिस ठाण्यात आणली आहेत. या झाडांची बोंडे तोडून त्याचे वजन केले असता साडेचार किलो वजन भरले. या प्रकरणात पोलिसांनी रामदास खोकले यांचा शोध सुरू केला आहे. त्याच्या अटकेनंतरच अफूच्या शेतीबाबत सविस्तर माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आकडा टाकून पिठाची गिरणी चालविणाऱ्यांवर पकडले

शिरडशहापूर: लोहरा खुर्द (ता. औंढा नागनाथ) येथे वीज वाहिनीवर आकडा टाकून पिठाची गिरणी चालवित असल्याप्रकरणी तिघांवर वसमत पोलिस ठाण्यात गुरवारी (ता. सात) गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत माहिती अशी की, लोहरा येथील पवन बरडे, कैलास कोळेकर, पिंटू जाधव हे तिघेजण पिठाची गिरणी चालवितात. जानेवारी (ता. ३०) सहायक अभियंता अश्विनकुमार मेश्राम व त्यांचे सहकारी लोहरा येथे वीज वाहिणीच्या तपासणीसाठी गेले होते. 

दंड भरला नसल्याने गुन्हा दाखल

या वेळी घरासमारून जाणाऱ्या वीज वाहिनीवरून आकडा टाकून वीज घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी महावितरण कंपनीचे ५३८ युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी प्रत्‍येकाला १२ हजार १८० युनिटची किंमत व पाच हजार रुपये, असा १७ हजार १८० रुपयांचा दंड ठोठावला. तो भरण्यासाठी त्‍यांना मुदतदेखील देण्यात आली होती. मात्र, त्‍यांनी मुदतीत दंड भरला नाही. त्यामुळे शुक्रवारी त्‍यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती अभियंता श्री. मेश्राम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

PMC Election 2025 : PMC निवडणुकीचा सस्पेन्स कायम! आरक्षणाची सोडत कधी? आयोगाने नियमावली दिली, पण तारीख गुलदस्त्यातच

Dr Ajay Chandanwale : डॉ. अजय चंदनवाले यांची एमयुएचएसच्या कुलगुरूपदी नियुक्ती

Unseasonal Rain : शेतकरी संकटात..! अंबडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा आणि वेचणीसाठी मजूर मिळेना, दुहेरी पेच

SCROLL FOR NEXT