Kothali Umarga News 
मराठवाडा

तरुण दहा दिवसापूर्वी पुण्यातून आला, अहवाल पॉझिटिव्ह, आता गावच केलं सील

महेश मोटे

मुरूम (जि. उस्मानाबाद): कोथळी (ता. उमरगा) येथील एका तरुणाचा अहवाल कोरोना बाधित आल्यानंतर हे गाव शनिवारी (ता. २३) रात्रीपासूनच सील करण्यात आले. हा रुग्ण १५ मे रोजी पुणे येथून गावी आला आहे. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण सहा जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोथळी येथील एका २५ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल शनिवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. शनिवारी रात्रीच या तरुणाच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ यांच्यासह संपर्कातील सहा जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. पुणे येथून हा तरुण ता. १५ मे रोजी कोथळी येथे आला होता. पुण्यामध्ये संपूर्ण कुंटूबासह तो राहत होता.

लॉकडाऊनमुळे काम नसल्याने पुण्यामध्ये राहून तरी काय करायचे, यापेक्षा गावाकडे गेलेले बरे म्हणून या तरुणासह त्याचे कुटुंब गावी आले होते. तब्बल आठ दिवसानंतर ता. २१ मे रोजी या तरुणास ताप आल्याने तो मुरूम (ता. उमरगा) येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आला होता. उपचारादरम्यान कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी लातूरला येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

शनिवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मुरुम व परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या रुग्णांच्या संपर्कातील किती जणांना संसर्ग झाला आहे, याची तपासणी आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. काही जणांना मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर येथे तपासणी करून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा़

मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयातून शुक्रवारी (ता. २२) तीन जणांचे स्वॅब घेऊन लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील कोथळी येथील या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर अन्य दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले. कोथळीच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच कोथळी गाव प्रशासनाकडून सील करण्यात आले.

या तरुणाचा कुठे- कुठे संपर्क आला आहे, त्याची माहिती घेतली जात आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह गावातील संपर्कातील अन्य नागरिकांचा रात्रीपासूनच शोध सुरु करण्यात येऊन संबंधीत सहा जणांना मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हा तरुण ता. २२ मे पासून ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे यांनी दिली.

रात्री उशीरा ही बातमी कळताच उमरगा येथील उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, सहायक पोलिस निरीक्षक यशवंत बारवकर आदींनी गावाला भेट देऊन चौकशी केली. दरम्यान सरपंच आप्पासाहेब पाटील, उपसरपंच निळकंठ कोट्टरगे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवानंद तुगावे, ग्रामसेवक गोपाळ घंटे, दिनानाथ पोतदार यांनी शनिवारी रात्रीच परिसर बंद ठेवून जनतेला बाहेर पडू नका, असे आवाहन केले. कोथळी गावालगत कर्नाटक राज्याची सीमा असल्याने अगोदरपासूनच तेथे पोलिस बंदोबस्त तैनात आहे. गावातील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT