anna prasasan.jpg 
मराठवाडा

चार प्रकरणात दहा लाखांचा मुद्देमाल जप्त....कोणता ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अन्न सुरक्षा मानद कायदा २००६ नियम व नियमन २०११ अन्वये गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कार्यवाही तसेच प्रतिबंधीत अन्न पदार्थासोबतच वाहनांची जप्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या चार प्रकरणात प्रतिबंधीतसाठा सात लाख सत्तर हजार ७४० रुपये व तीन वाहने किंमत दोन लाख ५५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा विभागाकडून कारवाइ
नांदेड येथील अन्न सुरक्षा अधिकरी स. वि. कनकावाड यांनी ता. चार एप्रिल २०२० रोजी माहूर तालुक्यातील पोलिस स्टेशन सिंदखेड येथे जावुन पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ व दुचाकी वाहन एकूण किंमत ४२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी जावेद बरकत खिच्ची (रा. वाई बाजार) याच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.

चार लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त
अन्न सुरक्षा अधिकारी सु. द. जिंतुरकर यांनी ता. आठ एप्रिल रोजी धर्माबाद मे. राजराजेश्वर किराणा दुकान बाळापुर रोड धर्माबाद यापेढीवर धाड टाकुन प्रतिबंधीत अन्न पदार्थ चार लाख ५९ हजार १९० रुपयाचा साठा जप्त करून या प्रकरणी रविकुमार शंकरराव कोडावार व राजकुमार शंकरराव कोंडावार याच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

दोन लाखांचे प्रतिबंधीत अन्न पदार्थ जप्त
देगलूर तालुक्यातील पोलिस स्टेशन मरखेल येथे ११ एप्रिल रोजी मरखेल पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा एक लाख २४  हजार आठशे रुपयांचा व वाहन किंमत दोन लाख रुपयांचा साठा जप्त करुन या प्रकरणी शेख जावेद शेख समदानी विरुध्द अन्न सुरक्षा कायदानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

अर्धापूरमध्ये कारवाइ
प्र. म. काळे यांनी अर्धापूर पोलिस स्टेशन अर्धापुर येथे जावुन ता. ११ एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ किंमत नऊ हजार ७५० रुपये व दुचाकी वाहन किंमत ३५ हजार रुपये असा एकूण ४४ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी शेख सोहेब शेख सलीम व फसिउददीन काजी यांच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिबंधीत अन्न पदार्थांची आठळल्यास कायदेशीर 
ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सहायक आयुक्त (अन्न), म.रा. अन्न व औषध प्रशासन  तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. प्रतिबंधीत अन्न पदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी छुप्या, चोरट्या पध्दतीने प्रतिबंधीत अन्न पदार्थांची विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही समोरे जावे लागेल, असे आवाहन, नांदेडचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT