Beed Accident News esakal
मराठवाडा

बीडमध्ये भीषण अपघात; टेम्पो पलटी झाल्याने एक ठार, दहा मजूर गंभीर जखमी

जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

भास्कर सोळंके

जातेगाव (जि.बीड) : कापूस खरेदी करून दुसरीकडे खरेदी केलेला मजूरासह कापूस भरण्यासाठी चाललेला भरधाव वेगातील टेम्पो पलटी झाला. यात टेम्पोतील एक जण ठार, तर अन्य दहा मजुर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.दोन) गेवराई-माजलगाव (Beed) राज्य रस्त्यावरील सुर्डी बुद्रुक येथे घडली आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद (Aurangabad) येथे हलविण्यात आले आहे.टाकरवण (ता.माजलगाव) येथील कापसाचे खासगी व्यापारी यांनी गोळेगाव (ता.गेवराई) येथे खरेदी केलेला दहा ते पंधरा क्विंटल कापूस भरुन टेम्पो हा दहा ते बारा मजूरासह पुन्हा टाकरवणकडे गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरून (Accident In Beed) भरधाव वेगात चाललेला टेम्पो सुर्डी बुद्रुक (ता गेवराई) जवळपास येताच अचानक चालकाचा ताबा सुटल्यामुळे पलटी झाला. (One Man Died, Ten Serious Injured In Accident In Beed)

टेम्पोतील अनिल एकनाथ लव्हाळे (वय ३०, रा. टाकरवण) या मजुराचा मृत्यू झाला. अन्य दहा मजुर गंभीर जखमी झाले असून यापैकी एका मजुराचा कोपरापासून हात बाजूला तुटून पडला. सदरील मजुराची प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. इतरांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT