घनसावंगी : विक्रम देशमुख यांचा सत्कार करताना व्यापारी. 
मराठवाडा

त्यांनी दिली तब्बल ७५ दुकानदारांना भाडेमाफी 

सुभाष बिडे

घनसावंगी (जि.जालना) - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थतीत तीन महिने दुकाने बंद होती. त्यामुळे अनेक व्यापारी, व्यावसायिक अडचणीत आले. ही बाब लक्षात घेत येथील तब्बल ७५ दुकानदारांचे एक महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय दादासाहेब संकुलाचे मालक विक्रम देशमुख यांनी घेतला. त्यामुळे दुकानदार, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थतीत देशात व राज्यात लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे घनसावंगी शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागली होती. त्यात अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय हातावर असणाऱ्या व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली.

घनसावंगी येथे बसस्थानक परिसरातील दादासाहेब व्यापारी संकुलात मोबाईल दुरुस्ती, लॉँड्री, दूध विक्रेता, सलूनसह ७५ दुकानदार, व्यापारी आहेत. या साऱ्यांना लॉकडाउनचा मोठा फटका बसला. अनेकजण आर्थिक अडचणीत सापडले. ही बाब लक्षात घेत संकुलातील व्यापारी, दुकानदारांचे एक महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय विक्रम नंदकुमार देशमुख यांनी घेतला. जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान सहन करीत त्यांनी व्यापारी, दुकानदारांनी दिलासा दिला हे विशेष.

यानिमित्त श्री. देशमुख यांचा व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्याम भोसले, प्रवीण जोगड, श्री. कोरडे, समाधान चांदर, अंकुश पवार, शेख अफसर, श्री. सय्यद यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

माझ्या आजोबांनी या भागातील पोलिस ठाणे, पूर्वीची जिल्हा परिषद शाळा यासह इतर शाळांना जागा दिली आहे. तीच परंपरा कायम ठेवत वडील नंदकुमार देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला करोडो रुपयांची दोन एकर जागा दान दिली. आमची  ही वडिलोपार्जित परंपरा कायम ठेवत आहोत. संकुलातील व्यापाऱ्यांचे आणि आमचे नाते आपुलकीचे आहे. त्यांना या संकटात धीर देणे आमचे काम आहे. आपण  त्यांच्यासाठी काही तरी करू, या उद्देशाने एक महिन्याचा किराया माफ करण्याचा निर्णय घेतला. 
- विक्रम देशमुख, जागामालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्णपणे बंदी

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT