मंठा : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्राध्यापकांसोबत संवाद साधताना विद्यार्थी.  
मराठवाडा

मंठ्याच्या प्राध्यापकांचे ऑनलाइन ज्ञानदान 

कृष्णा भावसार

मंठा (जि.जालना) -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वस्तरांतील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ असा आदेश शासनाने दिला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मंठ्याच्या प्राध्यापकांनी ऑनलाइन ज्ञानदान सुरू केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊनसह संचारबंदी लागू आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीतही येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानात खंड पडू दिलेला नाही. महाविद्यालयातील प्राध्यापक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांना दररोज दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान ज्ञानदान करीत आहेत.

दररोज नवीन पाहुणा प्राध्यापक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ऑनलाइन येत आहे. शनिवारपर्यंत (ता. ११) डॉ. राजेंद्र काकडे, डॉ. डी. पी. गाडगीळ, डॉ. स्वप्नील महामुने व डॉ. शशिकांत बोखड, डॉ. शशिकांत गवई, डॉ. शशिकांत बंडेवार अशा विविध तज्ज्ञ मंडळींनी विद्यार्थ्यांना विविध मुद्द्यांवर बेसिक व उपयोजित असे ज्ञानदान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेले आहे.

येणाऱ्या दिवसातही भारतासह अमेरिका व कॅनडा यासारख्या देशातूनही ऑनलाइनद्वारे तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुरूच राहणार आहे, असे समन्वयक डॉ. राजेंद्र काकडे यांनी सांगितले. दररोज विद्यार्थी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या या उपक्रमात भाग घेत आहेत. 

लॉकडाऊनच्या काळातही वैज्ञानिक, आरोग्य कर्मचारी, पोलिस, सफाई कामगार हे आपापले कर्तव्य चोख बजावत आहेत. स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील प्राध्यापक खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, गुगल क्लासरूम, व्हॉट्सअॅपद्वारे शिक्षण देत आहेत. 
- डॉ. भारत खंदारे, प्राचार्य, मंठा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT