Osamnanad Apghat.jpg 
मराठवाडा

Breaking : उस्मानाबादेत ओहरटेकच्या नादात टँकर-ट्रकचा भीषण अपघात, दोन जण गंभीर जखमी 

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : वडगाव (सि) परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. टँकर व ट्रक मध्ये ही जोराची टक्कर झाली असून त्यांनी इतरही वाहनांना धडक दिली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन्ही चालकांमध्ये तुळजापूर पासुन पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरु होती. याच ईर्षेमुळे हा मोठा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

वडगाव (ता.उस्मानाबाद) येथील मोरे नर्सरी जवळ थांबलेल्या गाड्यांना या दोन्ही मोठ्या वाहनाने धडक दिली आहे. त्यामुळे या वाहनाचेही मोठे नुकसान झाले. तर अपघातात दोघांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये  GJ १६ AU ७७०० ही गाडी वेगात आली. ती आयशरला धडकली. 

त्या बाजुला उभारलेल्या अजून एका वाहनाला टक्कर दिली. यामध्ये एक जण अडकून पडला होता. दोन चालकांच्या ईर्षेमुळं अनेक वाहनाच्या नुकसान झाले शिवाय अनेकांच्या जीवाला धोका देखील निर्माण झाला होता.

चार वाहनांचे नुकसान 
टँकर व ट्रक मध्ये ही जोराची टक्कर झाली. त्यामुळे या वाहनांचे नुकसान झाले. तर रस्त्याच्या कडेला असलेल्या अन्य चार वाहनांचे देखील नुकसान झाले. यामध्ये आयसर, बोलेरो, छोटा हत्ती आदी वाहनांचा समावेश आहे. 

जिल्हा रुग्णालयात दाखल
भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Edited BY Pratap Awachar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT