corona death new.jpg
corona death new.jpg 
मराठवाडा

Coronavirus : उस्मानाबादेत आज २७५ पॉझिटिव्ह, बळींची संख्या २७३ वर

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये कोरोना मीटर वेगात सुरुच आहे. शुक्रवारी (ता.१८) दिवसभरात २७५ नवीन रुग्णांची वाढ झाली. चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर जिल्ह्यामध्ये दिवसभरामध्ये ८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच आजपोवेतो जिल्ह्यात २७३ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८ हजार ३१० एवढ्या व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून एक हजाराहुन अधिक जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  

जिल्ह्यामध्ये आज आढळलेल्या २७५ पैकी ११० जण आरटीपीसीआरद्वारे तर १५१ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. १४ जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकट्या उस्मानाबाद तालुक्यात ७६ जण बाधित असून त्यामध्ये १५ जण आरटीपीसीआरद्वारे तर ५४ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. इतर जिल्ह्यामध्ये सात जणांना कोरोनाची लागन झाली आहे.

तुळजापुर तालुक्यातील ५५ जणांना बाधा झाली असुन त्यामध्ये १५ जण आरटीपीसीआरद्वारे तर ३८ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दोन जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत. उमरगा येथील ५९ जण बाधित झाले असून त्यामध्ये आरटीपीसीआरद्वारे ४६ जण तर दहा जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. इतर जिल्ह्यामध्ये तीघांना लागन झाली आहे. कळंब तालुक्यात २६ जण बाधित असुन त्यामध्ये १४ जण आरटीपीसीआरद्वारे व १२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंडा येथील १३, लोहारा आठ, भुम १६ व वाशी २२ अशा तालुकानिहाय रुग्णसंख्या आढळुन आली आहे.

मृत्यूत यांचा समावेश  
कळंब तालुक्यातील जायफळ येथील ६४ वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान लातुर येथील खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. तुळजापुर तालुक्यातील चिंचोली येथील ७५ वर्षीय स्त्रीचा तेथीलच उपजिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला. भुम तालुक्यातील वालवड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर भुम तालुक्यातील दिंडोरी येथील ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT