corona virus image.jpg 
मराठवाडा

Corona Breaking : उस्मानाबाद शहरात २७, ग्रामीण भागात ९३ रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू   

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शनिवारी आलेल्या अहवालात १२० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर कळंब येथील एका ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद शहर व तालुक्यात (२७) व अन्य ग्रामिणमध्ये ९३ रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्हा रुग्णालय येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र येथे एकुण ४१४ स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल शुक्रवारी रात्री उशीरा प्राप्त झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद (२७) उमरगा (२५), कळंब (१५), तुळजापुर (१३), वाशी (८), परंडा (३१), भुम (१) येथील रुग्णांचा समावेश आहे. 

उस्मानाबाद शहर 
शंकरनगर (३), टीपीएस रोड परिसर (५), जुना बस डेपो (१), जिल्हा रुग्णालय (१), शिवाजी नगर (१), ज्ञानेश्वर मंदीर परिसर (१) तर तालुक्यामध्ये पाडोळी (७), तेर (६), रुईभऱ (१), हिंगळजवाडी (१) येथे नव्याने रुग्ण सापडले आहेत.

तुळजापुर तालूका  
जिजामाता नगर (१), विश्वास नगर (२), यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (१), कुंभार गल्ली (१), मराठा गल्ली (१), कमानवेस (४) तर तालुक्यामध्ये मसला (२), सलगरा(१) आदी ठिकाणी रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

उमरगा तालूका
काळे प्लॉट (३), पतंगे रोड (२), बालाजी नगर (३), गौतम नगर (१), उपजिल्हा रुग्णालय (१) तर तालुक्यामध्ये माडज (४), तुरोरी (३), गुंजोटी (५), कोराळी (१) आदी ठिकाणी रुग्ण आढळले आहेत.

कळंब तालूका 
कळंब मध्ये खाटीक गल्ली (१), सोनार गल्ली (३), तर तालुक्यामध्ये रत्नापुर (४), चोराखळी (४), डिकसळ (१), येरमाळा (१), वडगाव निपाणी (१) आदी भागामध्ये रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

परंडा तालूका 

सोमवार गल्ली (३), शेवाळे गल्ली (३), नलसाब गल्ली (३), खंडोबा चौक (१), राजापुर गल्ली (१), समता नगर (१), मंगळवार पेठ (१), परंडा शहरातच (४), खुर्द एक (१) तालुक्यामध्ये शेलगाव (११), पंचपिंपळा (१) आदी भागामध्ये रुग्ण आढळले आहेत.

वाशी, भूम तालूका 
वाशीमध्ये बस स्टँड (५) व एस.बी.आय बँक (३) येथील रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. भुम तालुक्यातील ईट येथील (१) रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढून दोन हजार १५० इतकी झाली आहे. आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यु कोरोनाने झाला आहे.

संपादन-प्रताप अवचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT