corona death new.jpg
corona death new.jpg 
मराठवाडा

Corona Update : उस्मानाबादेत चोवीस तासांत पाच मृत्यू, तर बाधितांचा आकडा...

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये बुधवारी १२४ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर पाच जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. चार जण उस्मानाबाद तालुक्यातील तर एकजण उमरगा येथील आहे. एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या आता ७४ वर गेली आहे. 

जिल्ह्यामध्ये १२४ पॉझिटिव्ह आलेल्यापैकी आरटीपीसीआर मधुन ७५ जण तर रॅपिड अँटीजन टेस्टमधून ४९ लोकबाधित झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय येथुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे एकुण ३०२ स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते.

त्याचा अहवाल प्राप्त झाला त्यामध्ये २१३ निगेटिव्ह आले आहेत. तर ७५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. ९०८ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यातील ४९ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर उस्मानाबाद (३७), उमरगा (३४), लोहारा (१२), परंडा (१०), भुम (९), वाशी (२), तुळजापुर (१२) तर कळंब (८) अशी आहे. 

मृत्यु होणाऱ्याची संख्या पाच असुन त्यामध्ये पतंगे रोड उमरगा येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश  आहे. उस्मानाबाद शहरातील देवीमंदीर परिसरातील ५० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय वृध्दाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ते उस्मानाबाद तालुक्यातील सकनेवाडी गावचे रहिवाशी होते. शहरातीलच खाजा नगर भागामध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय पुरुषाचाही मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील ८० वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. अशा पाच जणाचा आज कोरोनाने मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

संपादन-प्रताप अवचार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT