zp parishad osamnabad.jpg 
मराठवाडा

अरे बाप रे..! ही जिल्हा परिषद केली सील, का ते वाचा सविस्तर..! 

राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. मंगळवारी (ता. सात) रात्री पॉझिटिव्ह अहवाल आला. शहरातील रामनगर भागात हा कर्मचारी राहतो. ही माहिती मिळताच जिल्हा परिषदेची इमारत सील करण्यात आली असून, या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांसह काही जणांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये उस्मानाबाद शहरातील रामनगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

हा रुग्ण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कर्मचारी असून कोरोनाशी निगडित जिल्हास्तरावरील दैनंदिन अहवाल तयार करून तो प्रशासनाकडे सादर करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यावर आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून तो आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. मंगळवारी नेहमीप्रमाणे या कर्मचाऱ्याने सायंकाळच्या सुमारास कार्यालयात जाऊन कोरोनाशी निगडित दैनंदिन अहवाल तयार करून संबंधित अधिकाऱ्याकडे सादर केला

. रात्री या कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. याची माहिती मिळताच संबंधित कार्यालयात त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याची तातडीने दखल घेत त्याच्या संपर्कात आलेल्या चार जणांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. आणखी किती व्यक्ती या रुग्णाच्या संपर्कात आल्या आहेत, याची माहिती घेण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारी (ता. आठ) जिल्हा परिषदेची इमारत सील करण्यात आली असून, बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले. मोजकेच कक्ष अधिकारी आणि काही विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे.   

सध्या एक दिवसासाठी जिल्हा परिषदेची इमारत सील केली आहे. आम्ही पूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करून घेत आहोत. आरोग्य अधिकाऱ्यांसह पाच जण क्वारंटाईन आहेत. पुरेशी काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी, 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांना शिवीगाळ, कागद भिरकावत वकिलाचे न्यायमूर्तींनाच आदेश; सुनावणीवेळी हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

Satana News : सटाण्यात घरपट्टीत ऐतिहासिक ५० टक्के कपात; ९०१ प्रलंबित व नव्या मालमत्तांना मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरोगी यांनी बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा सत्कार केला

Pune News : ‘खेलो इंडिया’ची सुवर्णपदक विजेती आता हवाई दलात ‘फ्लाइंग ऑफिसर’! ‘एएफएमसी’तील तरुणींचा प्रेरणादायी प्रवास

Police Housing: मुंबई पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सुटणार! 74 भूखंडांवर नवे गृहनिर्माण प्रकल्प उभारणार; सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT