File photo
File photo 
मराठवाडा

हुश्श... आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह, उस्मानाबादकरांना दिलासा

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनबाधितांचा आकडा वाढत असल्याने उस्मानाबादकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, येथील जिल्हा रुग्णालयातून बुधवारी (ता. दहा) पाठविलेल्या ३३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाले. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर एकाच्या अहवालाबद्दल निष्कर्ष निघू शकला नाही. तर एका रुग्णाचा दुसरा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान, आज एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या १३७ वर पोचली आहे. दररोज ही संख्या वाढत असल्याने उस्मानाबादकर गेल्या काही दिवसांपासून चिंतेत आहे. मात्र आज पाठविलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. बाधितपैकी ८५ जण बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यामध्ये आता सात हजार २६१ संशयित आहेत. त्यातील सात हजार २५१ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सहा हजार ३४१ होम क्वारंटाईन, तर ९१० लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत चार हजार ५७१ जणांनी चौदा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. तर एक हजार ६५८ इतक्या नागरिक घरी पाठविण्यात आले आहे.

आतापर्यंत दोन हजार १०८ लोकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून, त्यातील १३७ पॉझीटिव्ह आले आहेत. तर एक हजार ७९९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी तिघे परजिल्ह्यामध्ये बाधित झाले असले तरी त्यांचा समावेश जिल्ह्यामध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाने जिल्हयात आतापर्यंत तीन बळी गेले आहे. दोघांचा मृत्यू उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना झाला, तर अन्य एकाचा उमरगा येथे झाला होता. उस्मानाबाद, कळंब व उमरगा तालुक्यातील प्रत्येकी एक अशी तीन रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

तालुकानिहाय कोरोनाबाधित रुग्णसंख्या, तर कंसात बरे झालल्यांचा आकडा 
उस्मानाबाद - ५५ (२९), तुळजापूर - ०६ (०९), उमरगा - १६ (१५), लोहारा - ०७ (०१), कळंब - ३५ (१८), वाशी - ०४ (०), भूम- ०३ (०), परंडा - ११ (१३), एकुण -१३७ (७६). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT