Manoj Zende Committed Suicide Due To Lock Down 
मराठवाडा

लाॅकडाऊनने घेतला बळी! भावनिक सुसाईडनोट लिहित सलून दुकान चालकाने केली आत्महत्या

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : दुकान बंद ठेवल्याच्या तणावातून नाभिक समाजाच्या मनोज झेंडे यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वतः जीव दिला आहे. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असुन त्यामध्ये त्यांनी कारण स्पष्ट केले आहे. सांजा (ता. उस्मानाबाद) गावातील मनोज झेंडे या नाभिक समाज बाधवाने सलुन दुकान बंद असल्याच्या तणावातून विष पिऊन आत्महत्या केली आहे. घरातील परिस्थिती हालाखीची असुन संपुर्ण दुकानावर कुटुंबाचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.

मधल्या काही दिवसांत शासनाने मिनी लॉकडाऊन व विकेंड लॉकडाऊन जाहीर केल्याने दुकाने बंद झाली होती. दुकान बंद झाल्याने व अगोदरच कर्जाचा बोजा असल्याने त्याचा प्रचंड ताण त्यांच्यावर होता. शनिवारपासून (ता.दहा) पुन्हा संपुर्ण लॉकडाऊनची चर्चा सूरु असतानाच त्यानी रविवारी (ता.११) स्वतः जीव दिला आहे. ही धक्कादायक बाब जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली असुन समाजबांधवानी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचीही मागणी केली आहे.

चिठ्ठीमध्ये लिहिले कारण 
आत्महत्या करत आहे, यामध्ये कोणालाही दोषी धरु नये. मी माझ्या जीवाला कंटाळुन आत्महत्या करीत आहे. याच्यामध्ये माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. भावावर, पुतण्यावर, माझ्या बायका लेकरांवर आरोप करु नये, अशी कळकळीची विनंती त्यानी चिठ्ठीमध्ये लिहून केली आहे. कोरोनाला व गरिबीला कंटाळुन आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यानी पुढे केला आहे. सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT