file photo
file photo 
मराठवाडा

कळंबमधील रुग्णांच्या संपर्कातील २६ जणांचे अहवाल निगेटिव्ह

दिलीप गंभिरे

कळंब (जि. उस्मानाबाद) :कळंब (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील तीन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कळंबकरांना दिलासा मिळाला आहे.

शहरात एका व्यक्तीसह तालुक्यातील पाथर्डी येथील दांपत्य अशा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांच्या संपर्कातील २६ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून, या ठिकाणी नियमित अहवाल पाठविण्याचे काम सुरूच आहे. कळंब तालुक्यात बाधितांची संख्या अचानक तीनवर गेल्याने प्रशासनाने कडेकोट टाळेबंदी केली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष आहे. शहरातील एक आणि पाथर्डी येथील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब १४ मे रोजी उघड झाली होती. त्यानंतर दोघांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका रुग्णाला उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा : Big Breaking : नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह

तीनही रुग्णांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक 
कोरोनाबाधित तीन रुग्ण कळंब तालुक्यात आढळून आले आहेत. त्यापैकी पाथर्डी येथील दोघे मुंबई येथून परतलेले होते. तर अन्य एक रुग्ण महसूल विभागाचा कर्मचारी असून, ते शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी आहेत.

प्रशासनाने घेतलेल्या माहितीवरून शहराबाहेर कुणीही गेलेले नाहीत. त्यामुळे शहरातील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झालीच कशी, या चिंतेने प्रशासन हतबल झाले आहे. 
कळंब शहरातच कोरोना संसर्गाने बाधित असलेले रुग्ण फिरत असल्याचा संशय बळावत आहे. दरम्यान, तीनही रुग्णांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आले असून, त्यांचे लोकेशन शहर परिसरात असल्याचे उघड होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाने टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या हालचालींवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहेत. टाळेबंदी ही चौथ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यातच कळंब तालुक्यात कोरोना संसर्गाच्या बाधितांची संख्या तीन झाली आहे.

या तिघांना कोरोनाची बाधा झालीच कोठून? या चिंतेने प्रशासन काळजीत पडले आहे. तिघांची हिस्ट्री प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाची लागण झाल्याची एकही व्यक्ती उघडकीस आली नाही. मग संसर्ग झाला कोठून, असा प्रश्न आता कळंबकरांना पडला आहे. 
शहरात दुकाने बऱ्यापैकी सुरू होती. या गर्दीत कोणतीही लक्षणे नसलेला कोरोनाबाधित फिरला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील बाधिताच्या संपर्कातील सर्वांबद्दल प्रशासन आवश्यक ती काळजी घेत आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी (ता. १६) बाधितांच्या संपर्कातील १२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
- डॉ. जीवन वायदंडे, वैद्यकीय अधीक्षक, कळंब 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT