file photo 
मराठवाडा

अखेर तीन दिवसानंतर, २० जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन

सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या शहरातील त्या २० जणांना अखेर तीन दिवसानंतर इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रशासनाला उशीरा शहाणपण सुचले असल्याची भावना शहरातील नागरिक बोलून दाखवित आहेत.

चार एप्रिलला लातूर जिल्ह्यात आठ कोरोणाबाधीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्या सर्व आठ कोरोनाबाधीतांचा प्रवास उस्मानाबाद जिल्ह्यातून झाल्याचे उघड झाले होते. शहरातील एका धाब्यावर त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. व्यवस्था करताना शहरातील तब्बल २० जण त्या आठ कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आले होते. याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. तरीही काही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे संपर्कात आलेल्या त्या २० जणांना होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते.

वास्तविक जर एखादी व्यक्ती बाधीत रुग्णाच्या थेट संपर्कात आली तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करणे अपेक्षित असते. मात्र शहरातील त्या २० जणांना इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करण्याऐवजी होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. होम क्वारंटाईन असताना यातील अनेकजण बाहेर फिरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. शिवाय होम क्वारंटाईन केले असले तरी अपुऱ्या जागेमुळे ते अनेकांच्या संपर्कात येऊ शकतात, अशी परिस्थिती होती. यावरून नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा झाल्याने प्रशासनाची चांगलीच अडचण वाढली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रसिद्धी माध्यमांकडे स्पष्ट सुचना केल्या. त्यानुसार नागरिक कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आलेले आहेत, त्यांना थेट इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करण्यात यावे, असे आदेशीत करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (ता. सात) रात्री उशीरा त्या २० जणांची धरपकड सुरू झाली. अखेर बुधवारी सकाळी सर्व २० जणांना इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. 
 
तीन दिवस का लावले? 
चार एप्रिलला लातूर जिल्ह्यात आठजण कोरोनाबाधीत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तातकाळ म्हणजे पाच तराखेला सर्वांना इन्स्टीट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांचा बेफीकीरपणा अन त्याला मिळालेली पुढाऱ्यांची साथ यामुळे तीनही दिवस हे २० जण अनेकांच्या संपर्कात आलेले असू शकतात. एकीकडे काळजी घेण्याचे आवाहन करीत असताना काही सुज्ञ नागरिकांकडूनही चुकीचे कृत्य केल्याने सामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. 
 
अधिकाऱ्यांचे काय? 
काही अधिकारीही त्या आठ जणांच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसाठी वेगळे नियम अन्‌ कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईचा विकास रखडला? बीएमसी बजेटपैकी ४८% निधी अजूनही प्रलंबित, खर्चाचे आकडे समोर

Viral Video: धक्कादायक! आईनं १०व्या मजल्याच्या बाल्कनीतून मुलाला लटकवलं; वेगळंच कारण समोर, पाहा व्हायरल व्हिडिओ

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

Dhule News : दोंडाईचा पोलिसांची मोठी कामगिरी! वर्णेश्वर महादेव मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा

SCROLL FOR NEXT