file photo 
मराठवाडा

दररोज चार हजार लिटर दुधाची नासाडी

जावेद इनामदार

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी घटल्याने परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या १० दिवसांपासून दररोज जवळपास चार हजार लिटर दुधाची नासाडी होऊन एक लाख २० हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा चालू राहतील असे सरकारकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात जीवनावश्यक वस्तूंची मागणीच घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दूध आणि भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागतो आहे.

केसरजवळगा, आलूर, वरनाळ, बोळेगाव, बेळंब, कोथळी, बोरगाव, खैराट, सिंदगाव येथून दररोज जवळपास गायीचे तीन हजार, म्हशीचे एक हजार लिटर दुधाचे संकलन होते. एक लिटर गायीच्या दुधाला ३० रुपये दर होता तर म्हशीचे दूध ३६ रुपये प्रतिलिटर होते. गायीचे ९० हजार व म्हशीच्या दुधाचे ३६ हजार असे दोन्ही मिळून एक लाख २६ हजार रुपयांचे नुकसान होत आहे. काहीजण लॉकडाऊनचा फायदा घेत मागणी घटल्याने कमी दराने दुधाची विक्री करीत आहेत. तर अनेकांच्या दुधाची नासाडी होत आहे.

परिसरातील दूध बारामती येथील सह्याद्री व इंदापूरच्या सोनाई या खासगी दूध डेअरीसाठी जात होते. तेथून दुग्धजन्य पदार्थ पनीर, दही, ताक, दुधाची बुकटी, दुधाची पाकीटे विक्रीसाठी बाजारात येतात. लॉकडाऊनमुळे मागणीत मोठी घट झाली आहे. शिवाय कोरोनामुळे कामगारही काम करायला तयार नाहीत. दुधाचे टँकर येण्यास तयार नाही. चालकही घाबरत आहेत, अशी कारणे देत परिसरातील दूध संकलन केंद्रे बंद झाली आहेत. परिसरात सरकारी दूध डेअऱ्या नसल्यामुळे खासगी दूध डेअरीतच शेतकऱ्यांना दूध घालावे लागते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या संदर्भात सोनाई दूध संकलन केंद्राचे दूध संकलन कर्मचारी संतोष शिवमुर्ती यांनी सांगितले की माझ्याकडे परिसरातील जवळपास पाचशे दुधउत्पाकांकडून गायीचे एक हजार ३०० तर म्हशीचे ७०० असे दोन हजार लिटर दूध डेअरीला जाते. मात्र मागणी घटल्याने दूध खरेदी करण्यास दूध कंपन्या नकार देत आहेत. कोरोनामुळे घाबरून कामगार काम करायला तयार नाहीत. त्यामुळे दूध संकलन बंद आहे.

यासंदर्भात सह्याद्री दूधसंकलन केंद्राचे आलूर येथील संकलन चालक बसवराज लाटे यांनी सांगितले की माझ्याकडे परिसरातील गावातून गायीचे एक हजार ५०० व म्हशीचे ७०० लिटर दूध येथे संकलन झाल्यानंतर बारामतीच्या सह्याद्री दूध डेअरीत पाठवले जाते. कोरोनामुळे मागणी घटली आहे. टँकरही यायला तयार नाही, कामगार येत नाहीत. त्यामुळे दुधसंकलन बंद केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT