उस्मानाबाद : जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करीत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून मोबाईल फिव्हर क्लिनिकची संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तीन दिवसांमध्ये साधारण तीन हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदही ग्रामपातळीवर काम करीत आहे. कोरोनाप्रमाणे इन्फ्लुएन्झा, एच१एन१, सारी (SARI) अशा प्रकारच्या इतरही काही आजारांनी ग्रासलेल्या रुग्णाला ताप येतो. विविध तापसदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तत्काळ वैद्यकीय तपासणी होऊन निदान व्हावे, याकरिता ‘मोबाईल फिव्हर क्लिनिक’ ही संकल्पना जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
प्राथमिक आरोग्य केंद्र असलेली २४८ गावे वगळून उर्वरित सुमारे ५०० गावांमध्ये एकूण वीस ‘मोबाईल फिव्हर क्लिनिक’ पथके तैनात करण्यात आली होती. १३, १५ व १६ एप्रिल या कालावधीत ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात तापाचे १२५ रुग्ण आढळले असून, न्युमोनियाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तर रक्तदाब व मधुमेहाच्या तक्रारी असणाऱ्यांची संख्या अडीचशेच्या घरात असल्याचेही निदर्शनास आले आहे
.मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत पथके, रुग्णवाहिका गावात हजर राहून तपासणी करीत आहेत. तापसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची या पथकाद्वारे वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या कामासाठी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, एएनएम गावातील तापसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची माहिती घेत ‘मोबाईल फिव्हर क्लिनिक’ पथकाला देत आहेत. ही सर्व यंत्रणा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित गावाचे सरपंच, इतर लोकप्रतिनिधी तसेच कोरोना सहायता कक्षातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.