file photo 
मराठवाडा

दिव्यांग युवकाकडून लाखमोलाची मदत

चंद्रकांत गुड्ड

अणदूर (जि. उस्मानाबाद) : स्वतःचेच जगणे संघर्षमय अन्‌ शासन मदतीवर अवलंबून असलेल्या दिव्यांग किशोर मुळे यांनी लाखमोलाची मदत करीत माणुसकी जपली आहे. त्यांनी आपले एक महिन्याचे मानधन निराधारांसाठी चालविण्यात येत असलेल्या घरपोच जेवण अभियानाला दिले आहे. मदत छोटी असली तरी त्यामागील भावना मोठी असल्याचा प्रत्यय आला आहे.

संपूर्ण देशात गेल्या जवळपास २१ दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, निराधार, मतिमंद, दिव्यांगांचे जगणे असह्य झाले आहे. अशा गरजूंचा शोध घेऊन त्यांना दोनवेळा जेवण पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी केशव वाचनालय व साहेबराव घुगे मित्रमंडळाने पुढाकार घेतला आहे.

मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या अन्नदान योजनेत डोळ्याने अधू असलेल्या किशोर मुळे यांनी अपंग योजनेतून त्यांना शासनाकडून दरमहा मिळणारे एक हजार रुपये या अभियानाला देऊन मदत करीत माणुसकी जपली आहे. स्वतःच्याच जीवनात जगण्याचा संघर्ष सुरू असताना त्यांनी केलेली ही मदत गरजूंना जगण्यासाठी लाखमोलाची ठरली आहे. त्यांचे दातृत्व छोटे असले, तरी त्यामागची भावना मोठी असल्याचा प्रत्यय अणदूरवासीयांना दिला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 आडवाटेने प्रवास करणारे 
२० ऊसतोड मजूर ताब्यात 

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी असतानाही ट्रॅक्टर ट्रॅालीमधून आडवाटेने प्रवास करीत जाणाऱ्या २० ऊसतोड मजुरांना येरमाळा (ता. कळंब) पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी जिल्हा परिषदेच्या शाळेत केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथून पिंपळवाडी (ता. बार्शी) येथे निघालेले ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून आडवाटेने प्रवास करणाऱ्या २० ऊसतोड कामगारांना सोमवारी (ता. १३) दुपारी अडीचच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना येरमाळा येथील बांगरवाडी फाट्याजवळून ताब्यात घेण्यात आले. त्यांची रवानगी जिल्हा परिषदेच्या शाळेत महसूल प्रशासनाने उभारलेल्या तात्पुरत्या निवारागृहात करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

याप्रकरणी ट्रॅक्टरचालक व मालक गणेश पांडुरंग डुकरे (रा. घारी, ता. बार्शी), नितीन सोमनाथ जाधव, रामहरी श्रीमंत जाधव (दोघेही रा. पिंपळवाडी, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT