उस्मानाबाद नगरपरिषद 
मराठवाडा

उस्मानाबाद नगरपालिका निवडणुकीची लगबग सुरु,कार्यकर्त्यांची पळापळ

सयाजी शेळके

उस्मानाबाद : नगरपालिका निवडणुकीची (Osmanabad Municipal Council) लगबग सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांची पळापळ सुरू झाली आहे. तिकीट मिळावे, यासाठी अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र आघाडी झाली तर पत्ता कटणार, बिघाडी झाली तर संधी मिळणार. या समीकरणाने शहरात 'आघाडी का बिघाडी' याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शहरातील (Osmanabad) पालिकेमध्ये सध्या 39 नगरसेवक आहेत. यामध्ये प्रभाग रचना होऊन निवडणूक झाली होती. शहरात प्रामुख्याने शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party), भाजप (BJP) आणि काँग्रेसचे (Congress Party) असे प्रमुख पक्ष आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचेही बर्‍यापैकी प्राबल्या त्या-त्या परिसरात आहे. पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १७, शिवसेनेचे ११, भाजपचे आठ काँग्रेस दोन, तर एका पक्षाचा समावेश आहे.

नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे मकरंद राजेनिंबाळकर जनतेतून निवडून आलेले आहेत. दरम्यान गेल्या पाच वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये केल्यानंतर राष्ट्रवादीचे काही नगरसेवक त्यांच्या सोबत गेले. तसेच सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाआघाडी कार्यरत आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात महागडी राहणार कि सर्वच पक्ष स्वबळावर लढणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. तर अनेक कार्यकर्ते स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत आहेत.

वाॅर्डनिहाय निवडणुका

गेल्या पंचवार्षिक मध्ये प्रभागनिहाय निवडणूक झाली होती. यामध्ये मतदारांची संख्या मोठी असते. त्यामुळे उमेदवाराला प्रत्येक मतदारापर्यंत सहजपणे पोचणे कठीण जाते. आता वॉर्ड निहाय निवडणुका होणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. वॉर्डनिहाय मतदान होणार असल्याने ठराविक मतदार मिळविण्यात उमेदवारांसाठी सोपी बाब असते.

आघाडी झाली तर बंडखोरी वाढणार?

मला माझ्या परिसराचा विकास करायचा आहे. मी अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेतो. शिवाय मी माझ्या वॉर्डात अनेक कामे केली आहेत. त्यामुळे मला तिकिट मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेऊन अनेक तरुण कार्यकर्ते सर्वच पक्षातून पुढे येत आहेत. दरम्यान राज्याप्रमाणे शहरात महाआघाडी झाली तर अनेक इच्छुकांची संधी हुकणार अशी भीती इच्छुकांच्या मनात आहे. त्यामुळे बंडखोरी करून मैदानात उतरण्याची तयारी अनेकांनी केली आहे. प्रसंगी आघाडी नसेल तर बिघाडी करून रणांगणात उतरायचे असा सूर अनेक कार्यकर्ते लावत आहेत. त्यामुळे येणारी निवडणूक रोमहर्षक होईल असे संकेत मिळत आहेत.

इच्छुकांकडून चाचपणी

पक्षाकडून मला तिकीट मिळावे यासाठी अनेक जण नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्या वाॅर्डात आपला विजय कसा होईल हे समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. मीच कसा निवडून येतो, याची जुळवाजुळव करून उमेदवारी खेचून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेत्याकडून सर्वांनाच उमेदवारी देऊ, असा शब्द दिला जात असल्याने कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहेत. उमेदवारी नाही मिळाली तरीही रणांगण सोडायचे नाही, असा सुरूही कार्यकर्ते लावत आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT