बाजीराव तांबे  
मराठवाडा

पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून एकाचा खून

प्रकाश काशीद

परंडा (जि. उस्मानाबाद) : शेतरस्त्याचे काम, तसेच जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून देवळाली (ता. भूम) येथे शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. २६) रात्री साडेआठच्या सुमारास देवळाली येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी परंडा येथील पोलिस ठाण्यात बारा जणांविरोधात बुधवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले आहे.

देवळाली ते वंजारवाडी शेतरस्त्याच्या कारणावरून संशयित आरोपीचे भूम पंचायत समितीचे सदस्य बाजीराव तांबे (वय ४५, रा. देवळाली, ता. भूम) यांच्यासोबत नऊ मे रोजी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर प्रकाश भागवत गोरे यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली होती. जुगार अड्ड्याची माहिती बाजीराव तांबे यांनीच पोलिसांना दिली, असा संशय खून प्रकरणातील संशयित आरोपींनी घेतला होता.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याचा राग धरून चंद्रकांत तांबे, सूर्यकांत तांबे, मधुकर तांबे, रामनाथ तांबे, किरण तांबे, प्रवीण शेटे, अभिजित शेटे, श्रीपती विधाते, प्रकाश गोरे, दिनकर ऊर्फ दिनेश गोरे, भागवत गोरे व चंद्रकांत शेटे (सर्व रा. देवळाली) यांनी मंगळवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान दुचाकीने बार्शीकडे जाणाऱ्या बाजीराव तांबे यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर अडविले. त्यानंतर धारदार शस्त्राने बाजीराव तांबे यांच्या पोटात व हातावर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

जखमी बाजीराव तांबे यांना तत्काळ बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव राठोड, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब बनसोडे आदींसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

याप्रकरणी बाजीराव तांबे यांचे भाऊ अंकुश कल्याण तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारा जणांविरोधात परंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद तपास करीत आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल खांबे, स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक डी. एम. शेख आदी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT